पाकिस्तानींसाठी मुदतवाढ, भारताचा मानवतावादी निर्णय; परतण्यासाठी पुढील आदेशापर्यंत कालावधी, ७८६ जणांची भारत सोडला.

 पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला होता. त्यांना ३० एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश होते. आता सरकारने मानवता दाखवत मुदत वाढवली आहे. त्यामुळे ज्या पाकिस्तानी नागरिकांना भारतात थांबणे गरजेचे आहे, त्यांना दिलासा मिळाला आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना ३० एप्रिलपर्यंत भारत सोडण्यास सांगितल्यानंतर, गेले सहा दिवस पाकिस्तानी नागरिक अटारी बॉर्डरवरून मायदेशी जाण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र आता सरकारने ही मुदत वाढवली आहे. त्यानुसार पाकिस्तानी नागरिक आता पुढील आदेशापर्यंत मायदेशी परत जाऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.मानवतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याचे भारताने गुरुवारी स्पष्ट केले. केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयामुळे अपरिहार्य कारणांनी भारतात थांबणे गरजेचे असलेल्या अनेक पाकिस्तानी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर, केंद्र सरकारने कडक पावले उचलताना पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला.

सार्क व्हिसा असणाऱ्यांसाठी भारत सोडण्याची याआधीची मुदत २६ एप्रिल, तर वैद्यकीय व्हिसा असलेल्यांसाठी २९ एप्रिल ही होती. दीर्घकालीन व्हिसा असलेल्या आणि हिंदू पाकिस्तानी नागरिकांना यातून आधीच सूट देण्यात आली आहे.या मुदतीपर्यंत एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी २५ एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्यक्तिगत संपर्क साधून दिल्या होत्या. त्यानंतर मागील सहा दिवसांत ७८६ जणांनी अटारी-वाघा सीमेवरून भारत सोडला आहे. पाकिस्तान व्हिसावर भारतात आलेल्यांमध्ये ५५ राजकीय नेते आणि त्यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे. त्याच वेळी, एक हजार ४६५ भारतीय नागरिक पाकिस्तानमधून भारतात परतले आहेत.भारताने तडकाफडकी व्हिसा रद्द केल्यानंतर अनेक पाकिस्तानी महिलांनी त्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती.

काहींच्या कुटुंबांची ताटातूट झाल्याने, तर काहींचे नातेवाईक भारतात उपचार घेत असल्याने त्यांच्याकडून सरकारला याबाबत आवाहन करण्यात आले होते. आता केंद्राने देश सोडण्याची मुदत वाढविल्याने या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केलेल्या पाकिस्तानींच्या अर्जावरही या वाढीव कालावधीत निर्णय होऊ शकतो.पुढील आदेश येईपर्यंत पाकिस्तानी नागरिक आता अटारी सीमेवरून पाकिस्तानकडे प्रवास करू शकतात. याबाबतच्या आदेशात अंशतः सुधारणा करण्यात आली असून, योग्य परवानगी असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पुढील आदेशापर्यंत अटारी येथील एकात्मिक चेकपोस्टवरून पाकिस्तानात जाण्याची परवानगी देण्यात येईल.पाकिस्तानात परत पाठवणीच्या प्रक्रियेत असलेल्या अब्दुल वाहीद नामक ६९ वर्षीय पाकिस्तानी नागरिकाचा हृदयक्रिया थांबल्याने बुधवारी अमृतसरमध्ये मृत्यू झाला. पाठवणी करण्यासाठी पोलिसांनी त्याला श्रीनगरहून अमृतसरला आणले होते. तो मागील १७ वर्षांपासून भारतात राहत होता, त्याचा व्हिसा संपला होता.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.