माथ्यावर टिळा लावून ओळख लपवली, लग्नाचं आमिष दाखवून वारंवार संबंध, पण २ आधार कार्डांमुळे नराधमाचं भांडं फुटलं.

सुरुवातीला तो तरुण त्या मुलीला भेटत राहिला पण नंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शाहरुख एका हिंदू मुलासारखा राहत होता आणि जेव्हा तो मुलीला भेटायला जायचा तेव्हा तो कपाळावर टिळक लावायचा, त्यामुळे मुलीला त्याच्याबद्दल कधीही शंका आली नाही.मध्य प्रदेशमधील उज्जैन जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणाने आपली खरी ओळख लपवून एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार शारिरीक उपभोग घेतला. परंतु, ज्यावेळी महिलेने आरोपीकडे त्याचेच दोन आधार कार्ड पाहिले तेव्हा तो हिंदू नसून मुस्लिम समुदायाचा असल्याचे तिच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच तिने पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली.मध्य प्रदेशमधील उज्जैन जिल्ह्यातील चिमनगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. योगेंद्र वाडिया म्हणून ओळख असलेल्या एका तरुणाने एका मुलीशी आधी मैत्री केली. सुरुवातीला तो तरुण त्या मुलीला भेटत राहिला पण नंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

शाहरुख एका हिंदू मुलासारखा राहत होता आणि जेव्हा तो मुलीला भेटायला जायचा तेव्हा तो कपाळावर टिळा लावायचा, त्यामुळे मुलीला त्याच्याबद्दल कधीही शंका आली नाही.काही दिवसांपूर्वी, जेव्हा मुलीने त्या तरुणाच्या खिशात दोन आधार कार्ड पाहिले तेव्हा ती घाबरली. कारण दोन्ही आधार कार्ड योगेंद्रचे होते, पण एका कार्डवर त्याचे नाव योगेंद्र वाडिया असे लिहिले होते, तर दुसऱ्यावर शाहरुख सलीम खान( विनोद मिल की चाल येथील रहिवासी) असे लिहिले होते. जेव्हा मुलीने दोन्ही आधार कार्ड पाहिले आणि योगेंद्रला याबाबत विचारणा केली तेव्हा सुरुवातीला त्याने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला पण नंतर त्याने मान्य केले की त्याचे खरे नाव शाहरुख खान आहे.मुलीने सांगितले की, शाहरुख तिला ‘मी तुझ्याशीच लग्न करेन’ असे बोलून सतत शारीरिक संबंधही ठेवत होता. शाहरुखचे अगोदरच दुसऱ्या महिलेशी लग्न झाले आहे हे त्या मुलीला माहित नव्हते.

जेव्हा मुलीला शाहरुखने आपली ओळख लपवून फसवणूक केल्याचे सत्य कळले तेव्हा तिने ताबडतोब शाहरुखविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि चिमनगंज पोलिस ठाण्याने शाहरुखला अटकही केली.शाहरुखचे सत्य बाहेर कळल्यानंतर त्याचे वर्तन बदलले असल्याचा आरोप मुलीने केला. तो गेल्या अनेक दिवसांपासून मला मारहाण करत होता आणि धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत होता. मी विरोध केला तेव्हा शाहरुखने मला मारहाण केली आणि माझे सर्व पैसे काढून घेतले. तो या पैशाने जुगार खेळायचा. असे पीडितेने सांगितले.चिमनगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी गजेंद्र पाचोरिया म्हणाले की, मुलीच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे. तरुणाकडे दोन आधार कार्ड सापडले आहेत, ज्यांची चौकशी सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.