हमास पॅटर्न अन् मंगळवार, पहलगामवर हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी २२ एप्रिलचा दिवसच का निडवला?

पहलगाम हल्ल्याला आता ११ दिवस उलटून गेले आहेत. २२ एप्रिलला पहलगामच्या बैसरन येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. पण, दहशतवादी गेल्या सात दिवसांपासून पहलगाममध्ये होते, तरी त्यांनी हल्ल्यासाठी २२ एप्रिल हा दिवस का निवडला?जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत २६ पर्यटकांचा जीव घेतला. या घटनेला आता ११ दिवस झाले आहेत. याप्रकरणी भारत सरकार अॅक्शनमोडमध्ये असून पाकिस्तानला धडा शिवकण्याची तयारी सुरु असल्याचं देशातील हालचालींवरुन दिसून येत आहे. सध्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची शोध घेतला जात आहे. ते अजूनही पहलगाममध्ये लपून बसल्याची शक्यता आहे. तर, हे दहशतवादी पहलगाममध्ये हल्ल्याच्या सात दिवसांपूर्वीच आले असल्याचीही माहिती समोर आली आहे. सात दिवसांत त्यांनी अनेक ठिकाणांची रेकी केली त्यानंतर बैसरनची निवड केल्याची माहिती आहे. तसेच, त्यांनी २२ एप्रिल हीच तारीख का निवडली याचंही कारण समोर आल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, याबाबत काही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.टाइम्स नाऊच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलं आहे की, दहशतवाद्यांनी मंगळवारी हल्ला करण्याचं यासाठी ठरवलं कारण हिंदू धर्मात या दिवसाचं धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे. सेना किंवा सरकारने याबाबत अधिकृतपणे कुठलंही विधान केलेलं नाही. रिपोर्टनुसार, दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी पहलगामच्या तीन ठिकाणांची रेकी केली होती. यामध्ये आरु, अम्युझमेंट पार्क आणि बेताब व्हॅलीचा समावेश होता. पण, येथे सेनेची सुरक्षा अधिक असल्याने त्यांनी बैसरन हे ठिकाण निवडलं.हल्ला करण्याच्या सात दिवसांपूर्वीच हे दहशतवादी पहलगाममध्ये आले होते.

त्यांनी सात दिवसात या सर्व ठिकाणांची रेकी केल्याचीही माहिती आहे. ते बैसरन येथील पर्यटकांवर लक्ष ठेवून होते. कुठल्यावेळी तिथे जास्त गर्दी असते, अधिक पर्यटक असतात याचीही माहिती त्यांनी मिळवल्याचं, सूत्रांनी सांगितलं. त्यानंतर हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वी बैसरनची निवड करण्यात आली. तसेच, दहशतवाद्यांना त्यांच्या आकांकडून १८ एप्रिलला हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, २२ एप्रिलचा दिवस ठरवण्यात आला आणि दुपारी २ ते ३ च्या दरम्यान या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला.दुसरीकडे पाकिस्तानकडून गेल्या आठ दिवसांपासून सतत युद्धविरामचं उल्लंघन केलं जात आहे. जम्मू-काश्मीरच्या तीन सीमावर्ती भागांमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार केला जात आहे. तर, भारताकडून पाकिस्तानला चोख उत्तर देण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.