तुझी बहीण माझ्या खोलीवर… पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीची बॉडी मित्राच्या रुममध्ये सापडली.

पोलीस भरतीची तयारी करत असलेली एक तरुणी आपल्या मित्राच्या खोलीत संश्यास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आली आहे. तर, तिचा मित्र सध्या गायब आहे.लखनऊ: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. या तरुणीचा संशयास्पद परिस्थितीतील मृतदेह हा तिच्या मित्राच्या खोलीवर सापडल्याने या प्रकणाचं गूढ वाढलं आहे. तिच्या गळ्यावर तारने कापल्याच्याही खुणा आहेत. कुटुंबाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अत्याचारानंतर हत्येच्या प्रकरणाची नोंद केली आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील लखनऊचं असल्याची माहिती आहे .पोलीस भरतीची तयारी करत होती तरुणी येथील हजरतगंज येथे राहणाऱ्या या २४ वर्षीय तरुणीने बीकॉमची पदवी घेतली होती. सध्या ती पोलीस भरतीची तयारी करत होती. लखनऊ विद्यापीठात शिक्षण घेत असताना तिची ओळख पवन बरनवालसोबत झाली. ती रोजसकाळी कोचिंगसाठी अलीगंज जायची.

बुधवारी (३० एप्रिल) ती सकाळी १० वाजेच्या सुमारास कोचिंगसाठी घरातून निघाली होती. दुपारी साडेतीन वाजता पवन तरुणीच्या चुलत बहिणीकडे पोहोचला जी लखनऊच्या निशातगंज येथे एका कपड्याच्या दुकानात काम करतेय पवनने तिला सांगितलं ती तुझी बहीण माझ्या रुमवर आहे आणि माझ्याशी वाद घालत आहे. जेव्हा हे दोघेही खोलीवर पोहोचले तेव्हा ही तरुणी बेडवर मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यावर कापल्याच्या खुणा होत्या.हे पाहताच बहिणीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने पवनला सांगितलं की पोलिसांना याची माहिती दे. पण, पवन आधी घरी कळवू असं सांगून तिला आपल्या बाईकवरुन हजरतगंजच्या दिशेने निघाला. यावेळी वाटेत त्याने फोन कॉलचा बहाणा केला आणि गाडी थांबवली. बहीण गाडीवरुन उतरताच त्याने तेथून पळ काढला. मृत तरुणीच्या वडिलांनी आरोप केला आहे की, पवनचा भाऊ पोलिसांत असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. गळफास घेतल्याने मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण गळफास असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.