शिवकालीन शस्त्रविद्या व आत्मसंरक्षण शिबिराचा समारोप.

उदयनगर : तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथून जवळच असलेल्या वैरागड येथील सह्याद्री कृषी पर्यटन येथे शिवकालीन शस्त्रविद्या व स्वसंरक्षण शिबिर आयोजित केले होते. यामध्ये २३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला महाराष्ट्राच्या विविध भागातून हिंगोली मेहकर बुलढाणा वर्धा नागपूर या ठिकाणाहून मुलं शिबिरासाठी आले होते. २६ गुरुकुल कोल्हापूर येथून आलेले शिवराज आचार्यांनी या ७ दिवसांमध्ये मुलांना आत्मसुरक्षेच्या धड्यासोबतच शस्त्र, शास्त्र, संस्कृती, योगा, प्राणायाम, त्राटक, ध्यान आदी प्रशिक्षण दिले.

मुलींसाठी प्रशिक्षिका म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा संयोजिका वैशालीताई सतीश शेळके उदयनगर यांनी पूर्णवेळ जबाबदारी स्वीकारून यशस्वीरित्या पार पाडली. मुलांची दिनचर्या सकाळी ३ वाजता सुरू होऊन रात्री ११ वाजेपर्यंत विविध खेळयासोबतच प्रशिक्षण चिंतनवर्ग माहितीपट चित्रपट व त्यांच्या सुप्त गुणांचा विकास आणि पोहणे यामध्ये कालावधी अतिशय चांगला निघून गेला. असे मनोगत मुलांनी याप्रसंगी व्यक्त केले. त्यांनी आत्मसात केलेल्या विविध कलांचा प्रात्यक्षिक त्यांनी पालक आणि प्रमुख पाहुण्यासमोर प्रदर्शित केले. गुरुकुल परंपरेप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी आपाआपल्या आई वडिलांचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतले. दररोज १५ मिनिटं गो शाळेमध्ये जाऊन गाईंची सेवा केली. सदर समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प तेजराव बाबा जगताप हे होते.  श्वेताताई महाले यांचे वडील अंकुशराव पडघान यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थ्यांना आदर्श मावळा पुरस्कार देण्यात आले. तर समस्त पालका सोबत वैरागडचे सरपंच गजानन मामा गुंड, माजी जि. प. सदस्य शिवनारायण भाऊ नखोद. भास्कर बाबा साठे यांचे सह आदींची उपस्थिती होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.