कर्नाटकात एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. २१ वर्षांचा तरुण पैज जिंकण्यासाठी ५ बाटल्या दारु प्यायला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. कार्तिक असं मृत्यूमुखी पडलेल्या पडलेल्या तरुणाचं नाव आहे.बंगळुरु: कर्नाटकात एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. २१ वर्षांचा तरुण पैज जिंकण्यासाठी ५ बाटल्या दारु प्यायला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. कार्तिक असं मृत्यूमुखी पडलेल्या पडलेल्या तरुणाचं नाव आहे. कार्तिकनं त्याच्या मित्रांसह अन्य काही जणांसोबत दारु पिण्याची पैज लावली होती. ही पैज त्याच्यासाठी जीवघेणी ठरली. कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात ही घटना घडली.व्यंकट रेड्डी, सुब्रमणी आणि तीन अन्य जणांसोबत कार्तिकनं दारु पिण्याची पैज लावली होती. पाणी न मिसळता ५ बाटल्या दारु रिचवू शकतो, अशी शेखी कार्तिक मिरवत होता. त्यावर कार्तिकचा मित्र असलेल्या व्यंकट रेड्डीनं त्याला आव्हान दिलं. ५ बाटल्या दारु नीट (पाणी न मिसळता) पिऊन दाखव. तुला १० हजार रुपये देतो, अशी पैज रेड्डीनं लावली.










