पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हे सात दिवसांपासून पहलगाममध्ये होते. त्यांनी बऱ्याच ठिकाणांची रेकी केली. त्यांना सुरुवातीला आरू, अम्युझमेंट पार्क, बेताब व्हॅलीला लक्ष करायचं होतं. पण दोन दिवसांपूर्वी प्लॅन बदलला.पहलगामच्या बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला. परंतू, बैसरन ही दहशतवाद्यांचा पहिला पर्याय नव्हता. त्यांना पहलगाम भागातील अरु व्हॅली, अॅम्युझमेंट पार्क किंवा बेताब व्हॅलीमध्ये ही रक्तरंजित खेळ खेळायचा होता. परंतु सुरक्षा दलांची उपस्थिती, सुरक्षित सुटकेचे कमी पर्याय आणि कमी गर्दी असल्यामुळे त्यांनी आपला विचार बदलला, अशी माहिती आहे.हे दहशतवादी पहलगाम आणि त्याच्या आसपासच्या भागात सात दिवसांपासून फिरत होते. हल्ल्याच्या फक्त दोन दिवस आधी त्यांनी बैसरनची निवड केली. बैसरन हल्ला प्रकरणाच्या तपासादरम्यान मिळालेल्या सुगावांच्या आधारे आणि दहशतवाद्यांच्या ओव्हरग्राउंड वर्कर्सच्या चौकशीच्या आधारे ही माहिती समोर आली आहे.










