सूरजला दारूचे व्यसन होते. आणि तो नेहमी खडगाव रोडवरील सायरे देशी दारूच्या दुकानात दारू पिण्यासाठी जात असे. गेल्या काही दिवसांपासून सूरज दारूच्या दुकानातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत होता. नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडगाव रोडवरील देशी दारूच्या दुकानात किरकोळ वादातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एका तरुणाची हत्या करण्यात आली. काचेचा ग्लास फुटल्यावर दारू दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला इतक्या क्रूरपणे मारहाण केली की त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास वाडी पोलिस करत आहेत.सुरज भलावी असे मृतकाचे नाव असून, सोनबानगर येथील रहिवासी आहे. तो एका ऑनलाइन ग्रोसरी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा.










