झेंडे गायब, चौक्या रिकाम्या; पाक सैनिक गेले कुठे? पंजाबपासून गुजरातपर्यंत लक्षवेधी घडामोडी.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यांना कारवाईसाठी पूर्ण मुभा दिली.श्रीनगर: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यांना कारवाईसाठी पूर्ण मुभा दिली. त्यानंतर आता पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. भारताला धडा शिकवण्याची भाषा पाकिस्तान सरकारमधील मंत्री करत असले, तरी सीमेवरील परिस्थिती त्याच्या अगदी उलट आहे.दोन्ही देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील काही चौक्यांवरुन पाकिस्तानी सैनिक मागे हटले आहेत. पाकिस्तानच्या चौक्यांवरुन झेंडेही उतरवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक चौक्या पाकिस्तानी सैनिकांनी रिकाम्या केल्या आहेत. पाकिस्तानच्या कठुआच्या पर्गवालमधील चौक्यांमध्ये सध्या सैनिक नाहीत. पहलगाम हल्ल्यापासून जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर तणाव वाढला आहे.

पाकिस्तानी सैनिकांनी अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला आहे.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरु झालेली आहे. इत्तेहाद-उल-मुस्लिमीन आणि अवामी ऍक्शन कमिटीपासून वेगळं होण्याचे संदेश पोलिसांनी भिंतीवर लिहिले आहेत. याबद्दल नागरिकांना लाऊडस्पीकरच्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे. पोस्टर लावण्यात आलेले आहेत. काश्मीरमधील ४८ पर्यटनस्थळं बंद करण्यात आली आहे. सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पंजाबपासून गुजरातपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब सरकारनं सीमावर्ती भागात अँटी ड्रोन यंत्रणा तैनात करत आहे.

ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये होणारी ड्रोन आणि ड्रग्ज तस्करी हाणून पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ड्रोन पाडण्यासाठी अँटी ड्रोन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पाकिस्तानमधून अनेकदा ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये ड्रग्ज पाठवण्यात येतं. पंजाबमध्ये ड्रग्जची समस्या फार मोठी आहे.गुजरातमधील सगळ्यात मोठ्या कच्छ जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल आणि पोलीस हाय अलर्टवर आहेत. राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन कच्छमधील २१ लहान बेटांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. २६ जुलैपर्यंत लहान बेटांवर जाण्यास परवानगी नसेल. कच्छच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून याबद्दल आदेश काढण्यात आलेला आहे. यामध्ये काही धार्मिक स्थळांचाही समावेश आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.