कल्याणच्या बिर्ला कॉलेजमधून बाहेर पडला, तोल गेला अन् एसटीच्या चाकाखाली, मन हेलावणारी घटना.

कल्याणमध्ये बिर्ला महाविद्यालयाजवळ बसखाली चिरडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अमनकुमार दुबे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो १७ वर्षांचा होता. महाविद्यालयातून घरी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडी झाली होती.कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बिर्ला महाविद्यालयाजवळ बुधवारी दुपारच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसखाली चिरडून महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला. एसटीच्या मागील चाकाखाली येऊन दुचाकीवरील हा विद्यार्थी चिरडला गेला. अपघातात ठार झालेला हा मुलगा बिर्ला महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातंय.अमनकुमार दुबे (वय १७) असे बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

बुधवारी दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर अमनकुमार दुबे महाविद्यालयातून बाहेर पडला. तो दुचाकीवरून आपल्या घरी निघाला होता. बिर्ला महाविद्यालयासमोरच्या मुंबई-मुरबाड-अहिल्यानगर महामार्गावर सर्वाधिक वर्दळ सुरू असते. या रस्त्यावरून जात असताना अमनकुमार दुबे एसटी बसच्याखाली आला. बस पुढे जात असताना अचानक अमनकुमार दुबे दुचाकीसह तोल जाऊन बसच्या मागच्या चाकाखाली आला.अमनकुमार तोल जाऊन पडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दुचाकीवरील तरूण बसच्या मागच्या चाकाखाली येताच इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी ओरडाओरडा केला. एसटीच्या चालकानेही जागीच बस थांबवली. चाकाखाली आल्याने अमनकुमार दुबे गंभीर अवस्थेत होता.

गस्तीवरील वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी त्याला तात्काळ रूग्णवाहिकेतून जवळच्या रूग्णालयात नेले. तेथून त्याला केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले.महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर बिर्ला महाविद्यालयासमोरील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर वाहतूक पोलिसांना वाहतूककोडीं दूर केली. अपघातग्रस्त एसटी राजगुरूनगर बस आगाराची होती. या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चाैकशी केली जात आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. या रस्त्यावर नेमकी वर्दळ आणि गर्दी असते. मात्र, अचानक तोल जाऊन विद्यार्थी थेट बसच्या चाकाखाली आल्याचे बोलले जातंय.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.