अमित शहा ॲक्टिव्ह; पहलगाम हल्ल्यानंतर सरकार स्थापनेची तयारी; ‘त्या’ पत्रानंतर हालचालींना वेग.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान मोदींनी कालच तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली.नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान मोदींनी कालच तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. कारवाईची वेळ आणि ठिकाण तुम्ही निवडा, अशा शब्दांत मोदींनी सैन्य दलांना पूर्ण मुभा दिली. त्यामुळे पाकिस्तानविरोधात लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. एकीकडे पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी जोर धरत असताना दुसरीकडे मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेची तयारी सुरु झाली आहे. राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.मणिपूरमधील २१ आमदारांनी राज्यात शांतता नांदावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलं आहे.

लवकरात लवकर एक लोकप्रिय सरकार स्थापन करा, अशी मागणी आमदारांनी पत्रातून केली आहे. त्यामुळे आता मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी शहांकडे आली आहे. मंगळवारी गृह मंत्रालयाला आमदारांचं पत्र मिळालं. ते बुधवारी सार्वजनिक करण्यात आलं. मणिपूरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे. राज्यात लोकप्रिय सरकार आल्यास पुन्हा शांतता नांदू लागेल, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला आहे.मणिपूरमधील नागरिकांनी राष्ट्रपती शासनाचं स्वागत केलं होतं. पण आता त्याला ३ महिने उलटले आहेत.

पण त्यानंतर शांतता नांदण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत, असं आमदारांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. आताच काही पावलं उचलली न गेल्यास राज्यात पुन्हा हिंसा उफाळू शकते, अशी भीती पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.मणिपूरमधील अनेक संघटना राष्ट्रपती शासनाला विरोध करत आहेत. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं, अशी त्यांची मागणी आहे. मणिपूरमध्ये ३ मे २०२३ पासून मैती आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार सुरु आहे. त्यामध्ये २५० पेक्षा अधिक जण मारले गेले आहेत. हजारो लोक बेघर झाले आहेत. १३ फेब्रुवारीला केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. त्याआधी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी पदाचा राजीनामा दिला. मणिपूरच्या विधानसभेचा कार्यकाळ २०२७ पर्यंत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.