दारू पिताना मस्करी सुरू, अचानक झाला वाद अन् थेट काढला मित्राचाच काटा, पुण्यात खळबळ.

पुणे जिल्ह्यातील मंचर येथे एका दिव्यांग व्यक्तीची दारू पिताना झालेल्या शिवीगाळामुळे हत्या करण्यात आली. पोलिसांनी पाच तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. गणेश रवींद्र सोनावणे असे मृत तरुणाचे नाव असून, सिद्धेश रेणुके आणि विघ्नेश शेवाळे या आरोपींना 3 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.दारू पिताना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून मंचर येथे दिव्यांग व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडालीये. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात या खुनातील आरोपींंना अटक केली आहे. गणेश रवींद्र सोनवणे (वय 28) असे खून झालेल्या दिव्यांग तरुणाचे नाव असून सिद्धेश संतोष रेणुके (वय 19) तर त्याचा मित्र विघ्नेश अशोक शेवाळे (वय-२०, रा. लांडेवाडी, ता. आंबेगाव सद्या रा. मंचर) या दोन आरोपींना मंचर पोलिसांनी अटक केली आहे.आरोपी सिद्धेश संतोष रेणुके आणि विघ्नेश अशोक शेवाळे या दोघांना न्यायालयाने 3 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंचर परिसरात असणाऱ्या महात्मा गांधी विद्यालय व अण्णासाहेब आवटे महाविद्यालय भागात सोमवारी रात्री उशिरापर्यंत दिव्यांग गणेश हा सिद्धेश आणि विघ्नेश या मित्रांसोबत दारू पित बसला होता.यादरम्यान मस्करीत गणेश याने सिद्धेश आणि विघ्नेश यांना शिवीगाळ केली. त्यामुळे या दोघांनी दारूच्या नशेत आणि रागाच्या भरात सिद्धेश रेणुके याने दारूची बाटली फोडली आणि गणेशवर सपासप वार केले. यानंतर गणेश सोनवणे हा जागेवर कोसळला त्यातच त्याचा मृत्यू झाला. खून झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सूत्र हलवत अवघ्या पाच तासात आरोपींना अटक केली. दिव्यांग व्यक्तीचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत या खुनातील आरोपीना ताब्यात घेतले असून त्यांना 3 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या खून प्रकरणात पोलिसांकडून अधिकचा तपास हा केला जातोय. आरोपींची चाैकशी केली जाईल.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.