वाद टोकाला गेला आणि होत्याचं नव्हतं झालं, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाचं प्रेयसीसोबत भयंकर कृत्य.

डोंबिवलीत लिव्ह-इनमध्ये असलेल्या प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. आरोपी प्रियकर सुभाष भोईरला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी २४ तासांत आरोपीला कल्याणमधून अटक केली. अधिक तपास टिळकनगर पोलीस करत आहेत.लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकर प्रेयसीमध्ये किरकोळ भांडणातून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये होऊन प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचं भयंकर प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच कल्याण गुन्हे शाखा घटक ३ च्या पथकाने २४ तासात या प्रकरणाचा छडा लावत प्रियकर सुभाष श्रीधर भोईर (वय ४२) याला अटक केली. सुभाष हा शिवसेनेचा पदाधिकारी असून गेल्या तीन वर्षांपासून तो मृत महिलेसोबत ठाकुर्ली येथे राहत होता.कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष भोईर हा मृत महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादातून त्याने प्रेयसीचा खून केला.

महिलेच्या मृत्यू प्रकरणी आठ दिवसांपूर्वी टिळकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेचा कल्याण गुन्हे शाखा आणि टिळकनगर पोलीस समांतर तपास करत होते. कल्याण गुन्हे शाखेस तपासादरम्यान महिलेचा खून झाल्याची बाब समोर आली. यानंतर मयत महिलेच्या वडिलांनी २९ एप्रिलला टिळकनगर पोलीस ठाण्यात तशी तक्रार दाखल केली.दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. सुभाष हा पळून जाण्याचा बेतात असून तो कल्याण येथील गणेश घाट परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस उप निरिक्षक किरण भिसे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, पोलीस हवालदार विलास कडू, सुधीर कदम, विजय जिरे, सचिन भालेराव, पोलीस नाईक प्रविण किणरे, पोलीस शिपाई मिथुन राठोड,

विजेंद्र नवसारे यांच्या पथकाने कल्याण पश्चिम गणेशघाट येथे दुर्गाडी ब्रिजच्या खाली बुधवारी सायंकाळी पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेत अटक केली. सुभाष याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. कल्याण गुन्हे शाखेने त्याला टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.सुभाष हा शिवसेनेचा पदाधिकारी असून मृत महिला ही नर्स होती. कोरोना काळात या दोघांची ओळख झाली होती. यानंतर ते ठाकुर्ली येथे गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. सुभाष याच्या पत्नीचं निधन झालं होतं. तर त्याची प्रेयसी ही तिच्या पतीपासून विभक्त झाली होती, या दोघांनाही मूलं आहेत, अशी माहिती विश्वसनीय पोलीस सूत्रांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.