किल्ले शिवनेरीवर १५ ते २० शेतकऱ्यांवर मधमाशांचा हल्ला; शिवाई देवीचा अभिषेक सुरु असताना घटना.

गेल्या काही महिन्यांत शिवनेरीवर मधमाशांच्या हल्याची ही चौथी घटना आहे.​ शिवाई देवी मंदिराबाहेर लातूर येथून आलेल्या १५ ते २० शेतकऱ्यांवर मधमाशांनी हल्ला चढवला. जुन्नरच्या शिवाई देवी यात्रेच्या औचित्याने किल्ले शिवनेरीवर बुधवारी शिवाई देवीच्या अभिषेकाचा सोहळा सुरू असतानाच, शिवाई देवी मंदिराबाहेरील किल्ले मार्गावर लातूर येथून आलेल्या १५ ते २० शेतकऱ्यांवर मधमाशांनी हल्ला चढवला. काही मधमाशांनी मंदिरातील भाविकांनी चावा घेतला. गेल्या काही महिन्यांत शिवनेरीवर मधमाशांकडून हल्ल्याची ही चौथी घटना आहे.

माशांपासून बचाव करण्यासाठी शेतकरी गळ्यातील उपरण्यांनी माशांना झटकत, शिवाई देवीच्या मूळ मंदिराच्या दिशेने पळत सुटले. त्या वेळी मंदिराजवळ दर्शनासाठी गेलेले पत्रकार धर्मेंद्र कोरे आणि त्यांच्या पत्नी मनीषा कोरे यांनी शेतकऱ्यांना हालचाल करू नका, उपरणी झटकू नका, असे सांगितले; परंतु हे शेतकरी काही न ऐकता पळतच राहिले. पुढे रस्त्याचा मार्ग बंद असल्याने हे शेतकरी पुन्हा माघारी फिरून मंदिराच्या दिशेनेपळाले.मंदिराबाहेर मधमाशांच्या झुंडी फिरत होत्या. काही माशा मंदिरात घुसल्याने चार ते पाच भाविकांनाही त्यांनी लक्ष्य केले.

जुन्नर रेस्क्यू टीमचे समन्वयक रूपेश जगताप, राजकुमार चव्हाण, सुजल बिडवई, ओम बिडवई; तसेच पुरातत्व खात्याचे कर्मचारी गोकुळ दाभाडे यांनी कोरे यांच्यासह जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल केले.बेशिस्त वर्तन टाळा‘गडावर आलेल्या लातूरच्या शेतकऱ्यांच्या समूहाने उपरणी झटकून माशांचा प्रतिकार करण्याचा प्रकार केला. त्यामुळे माशा उद्विग्न झाल्या आणि प्रतिहल्ला परतवताना माशांनी उग्र रूप धारण केले. पर्यटकांनी अशा घटनेत शिस्त पाळली, तर माशांचा हल्ला रोखता येणे शक्य आहे,’ असे सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे अध्यक्ष राहुल जोशी यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.