वाहनांच्या आवाजाचा नागरिकांचा त्रास कमी होणार, ३५ उड्डाणपुलांवर लावणार रोखणार साऊंड बॅरिअर्स; मुंबईत रहिवाशांना मोठा फायदा.

मुंबईतील काही उड्डाणपुलांवर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ध्वनिप्रतिबंधक लावण्यात येणार आहेत. अंधेरीतील गोखले उड्डाणपुलावर हे काम लवकरच सुरू होईल. गोरेगाव आणि चेंबूरमधील उड्डाणपुलांवरही ध्वनिप्रतिबंधक बसवले जातील. अनेक जुन्या पुलांचे सर्वेक्षण करून ३५ उड्डाणपुलांवर हे प्रतिबंधक लावण्याचे नियोजन आहे.वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या आवाजाचा परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी अंधेरीतील गोखले उड्डाणपुलावर दुतर्फा ध्वनिप्रतिबंधक (साऊंड बॅरिअर्स) लावण्यात येणार आहेत. त्याचा प्रस्ताव आणि खर्च तयार करण्याचे काम सुरू आहे. पूल पूर्ण होताच पावसाळ्यानंतर त्याचे काम हाती घेण्याचे नियोजन आहे. याबरोबरच स्थानिकांच्या मागणीनुसार गोरेगाव आणि चेंबूरमधील दोन उड्डान पुलांनाही ध्वनिप्रतिबंधक बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने घेतला आहे. या वर्षाच्या आत ध्वनिप्रतिबंधक बसवण्यात येणार आहे.त्यादृष्टिनेही पुलांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी केल्या, हा पूल पूर्ण होताच त्यावरून पुन्हा मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होईल. वाहनांच्या आवाजामुळे पुलाच्या आजूबाजूला असलेल्या इमारतीमधील रहिवाशांना त्रास होऊ नये, यासाठी दुतर्फा ध्वनिप्रतिबंधक लावण्याचा निर्णय घेतला आहे. ध्वनिप्रतिबंधकाचा नेमका खर्च किती, कोणत्या प्रकारचे ध्वनिप्रतियंधक बसवणे योग्य इत्यादीचेही नियोजन केले जात आहे.

जुन्या उड्डाणपुलांवर ध्वनिप्रदूषणापासून बचाव करण्यासाठी मुंबई महापालिकेने ध्वनिप्रतिबंधक बसवण्याची योजना आखली आहे. काही नव्याने बांधलेल्या पुलांवर आधीच, असे प्रतिबंधक आहेत. अशा २०१७ पूर्वी बांधलेल्या उड्डाणपुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी साधारण दोन वर्षांपूर्वी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार इमारती, शाळा महाविद्यालय, रुग्णालय जवळच असलेल्या लहान मोठ्या ३५ उड्डाणपुलांवर ध्वनिप्रतिबंधक बसवण्याचे नियोजन करण्यात आले.यातील गरजेनुसार बहुतांश उड्डाणपुलांवर ही यंत्रणा बसवण्यात आली. तर आणखी आठ ते दहा पूल बाकी असून, त्यामध्ये गोरेगावमधील सुधीर फडके पूल, चेंबूरमधील स्वामी नारायण पुलाचा समावेश केला आहे. येथील स्थानिक आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार ध्वनिप्रतिबंधक लावण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाचे दुसऱ्या टप्प्यातील मुख्य बांधकाम १०० टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई महापालिकेने निश्चित केलेल्या कालमर्यादेत म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत पूल आणि पुलाची इतर सर्व आनुषंगिक कामे पूर्ण होत आहे.लोअर परळमधील डिलाइल रोड उड्डाण पुलावरील पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा शेवटचा मार्ग २३ नोव्हेंबरपासून वाहनांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे करी रोड, लोअर परळ, चिंचपोकळी, भायखळा परिसरातील वाहनचालकांना दिलासा मिळाला. आता याच पुलाला दोन सरकते जिने बसवण्यात आले आहेत, काही तांत्रिक कामे पूर्ण करून मे महिन्यात सरकते जिने सुरू करण्यात येणार आहेत. एक जिना रेल्वे स्थानक दिशेने, तर दुसरा सरकता जिना एन. एम. जोशी जंक्शन दिशेने डिलाइल पुलाच्या दिशेने बसवण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.