वाद अन् मुंबईहून आलेल्या मुलाने आयुष्य संपवलं, धक्का सहन होईना, माय-लेकीनेही तेच केलं, अन्…

आईसोबतच्य वादाने नाराज झालेल्या एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली. जेव्हा आईने आपल्या मुलाचा मृतदेह पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला. मग तिनेही विष घेतलं आणि तिला पाहून मुलीनेही तेच केलं.आई रागावली म्हणून नाराज झालेल्या एका मुलाने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. जेव्हा आई घरी पोहोचली तेव्हा लेकाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून तिला मोठा धक्का बसला. त्यानंतर तिने आणि १४ वर्षांच्या लेकीने विष घेत जीव देण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये मुलीचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती गंभीर आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या हरपूर-बुधात कुटादेहरी या परिसरात बुधवारी (३० एप्रिल) ही हृदयद्रावक घटना घडली.शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गंभीर परिस्थिती असलेल्या आई आणि मुलीला बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले. जिथे डॉक्टरांनी मुलगी सुप्रियाला मृत घोषित केले.

तर, आई कौशल्या देवी यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. दुसरीकडे, मोहितचा मृतदेह फासावरून खाली आणल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.कूचादेहरी येथील मोहितचे वडील अंगद कन्नौजिया यांचे १० वर्षांपूर्वी निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर, मोहित लहानपणीच पैसे कमवण्यासाठी मोठे वडील आणि काका यांच्यासोबत मुंबईला निघून गेला. तर, गावात त्याची आई कौशल्या देवी, बहीण सुप्रिया आणि बाबा हरिलाल राहत होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.