१ मे महाराष्ट्र दिन… ध्वजारोहण

१ मे महाराष्ट्र दिन… ध्वजारोहण ‘महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महानकोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान’, अशी ज्या राज्याची ओळख करून दिली जाते असं हे देशाच्या नकाशावरील ठसठशीत दिसणारं महाराष्ट्र राज्य. 1 मे हा दिवस या राज्यासाठी अतिशय खास, कारण हा दिवस आहे, महाराष्ट्र दिनाचा. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. 1960 मध्ये म्हणजेच 65 वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती आणि याच दिवशी महाराष्ट्रासह गुजरात राज्याची स्थापनादेखील करण्यात आली होती.दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी सांस्कृतिक, शासकीय तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

शाळा, कॉलेजेस, सरकारी संस्था या ठिकाणी विशेष परेड, संस्कृतिक कार्यक्रम, झेंडावंदन आयोजित केले जाते. या दिवशी महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभरात पसरलेले सर्वच महाराष्ट्रीयन लोक मोठ्या उत्साहात, आनंदाने आणि अभिमानाने साजरा करतात.आज उपविभागीय अधिकारी भाग एरंडोल यांच्या कार्यालयातील प्रांगणात शासकीय ध्वजारोहण करत एरंडोल विधानसभा मतदारसंघातील माय-बाप जनतेला महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा शुभेच्छा दिल्या. या ध्वजारोहणा नंतर जम्मु काश्मिर येथील पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व निष्पाप लोकांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच एरंडोल तालुक्यातील ग्राम महसुल अधिकारी यांनी शासनाचा दिलेल्या महसुल उद्दीष्टाची पुर्तता केल्याबद्दल त्यांचा देखील प्रशस्ती पत्र देत सत्कार करण्यात आला.

तर एरंडोल तालुक्यातील विविध शासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाकडुन गौरव करण्यात आला. या गौरवानिमित्ताने त्या संबंधित विभागांचा प्रमुख अधिकाऱ्यांचा देखील यावेळी सन्मान करत आगामी काळात अशीच उल्लेखनीय कामगिरी करत राहण्यासाठी शुभेच्छा प्रदान केल्या.प्रसंगी उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, एरंडोल तहसिलदार प्रदिप पाटील, एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, पोलीस निरिक्षक निलेश गायकवाड, एरंडोल पंचायत समितीचे गटविकासअधिकारी दादाजी जाधव, गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, धरणगांव बाजार समितीचे मा.सभापती शालिकभाऊ गायकवाड, मा.नगरसेवक जगदीश ठाकुर यांचेसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व आदी मान्यवर उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.