दोन एसी लोकलमध्ये आधीच तासाहून जास्त अंतर, त्यातच ट्रेन रद्द; मध्य रेल्वेचे प्रवासी भडकले.

मध्य रेल्वेचे अधिकृत यात्री ॲपमधील लोकल वेळापत्रकानुसार, २४ तासांपैकी पाच तास असे आहेत, ज्यात एकही वातानुकूलित लोकल उपलब्ध नाही. त्यादरम्यान तिकीटविक्री कशी होते, असा प्रश्न राजू माने या प्रवाशाने उपस्थित केला आहे. उन्हाळ्यात उपनगरी रेल्वेतील वातानुकूलित (एसी) फेऱ्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळत असला तरी त्याचा त्रास त्याहून जास्त सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेवर दोन एसी लोकल फेऱ्यांमध्ये एका तासाहून अधिक अंतर आहे. अशात ही लोकल रद्द झाल्यास त्याचा फटका प्रवाशांना बसतो.पश्चिम रेल्वेवर सलग एसी लोकल असतात. त्यामुळे सामान्य लोकलमधील प्रवाशांना साध्या लोकलसाठी प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय उरत नाही. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असा नाराजीचा सूर रेल्वे प्रवाशांचा आहे.

मध्य रेल्वेचे अधिकृत यात्री ॲपमधील लोकल वेळापत्रकानुसार, २४ तासांपैकी पाच तास असे आहेत, ज्यात एकही वातानुकूलित लोकल उपलब्ध नाही. त्यादरम्यान तिकीटविक्री कशी होते, असा प्रश्न राजू माने या प्रवाशाने उपस्थित केला आहे.नियमानुसार रेल्वेचे तिकीट एक तास चालत असेल आणि त्यावेळेत गाडी नसेल तर तिकिटे का विकतात, अशी विचारणा करत त्यांनी ठाणे स्थानकातून धावणाऱ्या एसी लोकल फेऱ्यांचा तपशीलच दिला. ठाण्याहून पहाटे ५.२४ नंतर सकाळी ६.५५, सकाळी ९.२२ नंतर सकाळी १०.२३, दुपारी ३.४६ नंतर सायंकाळी ५.१९, सायंकाळी ५.५६ नंतर सायंकाळी ६.५७, रात्री १०.०८ नंतर ११.२८ या लोकल फेऱ्यांमध्ये एक तासांहून अधिकचे अंतर आहे.दुसरीकडे, मध्य रेल्वेने भिवपुरी रोड आणि कर्जतदरम्यान विद्यूतवाहिनी संबंधित कामे करण्यासाठी रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे.

मंगळवार २९ एप्रिल ते ४ मेच्या मध्यरात्रीपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. मध्यरात्रीनंतर २ ते ३.३० अशा दीड तासांत हा ब्लॉक असेल. ब्लॉक वेळेत काही मेल-एक्स्प्रेसला पनवेल आणि ठाणे स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून कर्जतसाठी मध्यरात्रीनंतर ००.१२ वाजता सुटणारी लोकल बदलापूर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. बदलापूर ते कर्जतदरम्यान ही लोकल रद्द राहणार आहे. ब्लॉक कालावधीत रात्री ११.३० सीएसएमटी-कर्जत ही कर्जत स्थानकात पोहोचणारी शेवटची लोकल असणार आहे. कर्जत येथून सीएसएमटीसाठी मध्यरात्रीनंतर २.३० वाजता सुटणारी लोकल बदलापूर स्थानकातून चालवण्यात येणार आहे.ब्लॉकमुळे आठ मेल-एक्स्प्रेस कर्जत – पनवेल – दिवा मार्गे धावणार आहेत. यामुळे मेल-एक्स्प्रेस २०-३० मिनिटे विलंबाने धावतील, अशी माहिती देण्यात आली. गाडी क्रमांक ११०२० भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, १८५१९ विशाखपट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस, १२७०२ हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, १११४० होस्पेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, २२७१८ सिकंदराबाद – राजकोट, १६६१४ कोयंबतूर-राजकोट, २०९६७ सिकंदराबाद-पोरबंदर, १२७५५ काकिनाडा फोर्ट-भावनगर या एक्स्प्रेसचा समावेश आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.