भीषण अपघात! भरधाव कार घरावर आदळली…

आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात बुधवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाच वैद्यकीय विद्यार्थ्यांसह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात दुपारी २.३० च्या सुमारास पाथिरेड्डीपालेम गावाजवळील महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ घडला. एका वळणावर कार अनियंत्रित झाली आणि घरात घुसली.आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात एक अतिशय भीषण आणि तितकीच दुःखद घटना घडली. काल (३० एप्रिल) एसपीएसआर नेल्लोर जिल्ह्यातील कोवूर परिसरातील, पोथिरेड्डीपालेम गावातील सुब्बारेड्डी पेट्रोल पंपजवळ असलेल्या महामार्गालगत ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की ही कार महामार्गालगत असलेल्या एका घरात घुसली. या अपघातात ५ वैद्यकिय विद्यार्थ्यांसह एका ६५ वर्षिय वृद्धाचा जीव गेला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात दुपारी अडीच वाजताच्या सुमारास झाला. नेल्लोरमधील नारायण मेडिकल कॉलेजमधील सहा विद्यार्थी बुचिरेड्डीपालम येथील एका कार्यक्रमातून परतत होते.

त्यांची कार डोंगरावर चढत असताना नियंत्रणाबाहेर गेली आणि महामार्गावरील पाथिरेड्डीपालेम गावाजवळील पेट्रोल पंपाजवळील एका वळणावर वेंकट रामानय्या यांच्या घरावर आदळली. पोलिसांनी सांगितले की, कारमधील सर्व प्रवासी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी होते. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. उपचारादरम्यान पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या घरावर ही कार आदळली त्या घरातील रमणय्या यांचाही अपघातात मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्यांची ओळख अभिषेक, जीवन, नरेश, अभिसाई आणि यज्ञेश अशी झाली आहे. नवनीत नावाचा आणखी एक विद्यार्थी नारायण रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम १०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

पोलीस अपघाताचे कारण तपासत आहेत. कार चालक दारू पिऊन होता की इतर काही कारणाने गाडीवरील नियंत्रण सुटले याचा शोध घेण्याचा प्रयत्न सद्ध्या सुरू आहे.मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. “या अपघातात पाच वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला हे दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून सहानुभूती आहे,” असे त्यांनी सांगितले आणि राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे राहील असे आश्वासन दिले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातही शोककळा पसरली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. पोलिसांनी सांगितले की तपास सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.