नौकरी मधील सहकारी यांनी विश्वासात घेवून ३० लाख रुपयाकरीता घात केलेल्या आरोपीतांना स्थागुशा जळगाव पथकाने घेतले ताब्यात.
जळगाव तालुका पो.स्टे. मिसिंग नं. ६१/२०२४ मधिल बेपत्ता महिला स्नेहलता संजय चुबळे, वय ६० रा.धनश्री नगर मोबाईल टावर समोर खोटेनगर जळगाव हि दिनांक २०/०८/२०२४ रोजी स्टेट बँकेतून ३० लाख रुपये घेवून गेली असले बाबत मिसिंग दाखल करण्यात आली होती. सदर मिसिंग दाखल होवून १० दिवस झाल्यानंतर देखील सदर महिला शोध लागत नसल्याने तिचे घरची मंडळी वडील व भाऊ हे मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांना भेटल्या मुळे सदर मिसिंगचे चौकशी कामी मा.श्री बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक स्थागुशा जळगाव यांना आदेश दिले होते.

त्यावरून बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक स्थागुशा जळगाव यांनी सफौ विजयसिंग पाटील, पोह जितेंद्र पाटील, पोह सुधाकर अंभोरे, पोह अकरम शेख, पोह महेश महाजन, पोह लक्ष्मण पाटील, पोना राहुल पाटील, भारत पाटील सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांचे पथक तयार करून सदर मिसिंग मधील संशयीत यांना विचारपुस करणे बाबत आदेश दिलेत.












