तलवार घेवून दहशत माजविणारा स्था.गु.शा.च्या जाळयात…

तलवार घेवून दहशत माजविणारा स्था.गु.शा.च्या जाळयात…

जळगांव जिल्ह्यात मिश्र वस्तीच्या ठिकाणी व इतर ठिकाणी वावरत असतांना सण उत्सवाच्या काळात काही समाजकंटाकडून शस्त्र संदर्भात कारवाई करा. असे वेळोवेळी आदेशीत करण्यात आले होते. त्याअनुषंगाने मा.डॉ. महेश्वर रेड्डी सो 1. पोलीस अधीक्षक जळगांव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगांव यांच्या मार्गदर्शना खालील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड, यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकातील पो.हे.कॉ. मुरलीधर धनगर, पो.हे.कॉ. संघपाल तायडे, पो.कॉ. प्रविण भालेराव यांना नेमण्यात आले होते. त्या अनुषंगाने दि.०४/०९/२०२४ रोजी ११-३० वाजे सुमारास तडवी गल्ली, हरीविठ्ठल नगर, जळगांव येथील मशिद जवळ एक इमस हातात तलवार घेवुन आराडा ओरड करणारा इसम नामे नरेश जगदिश सोनवणे, रा. हरीविठ्ठल नगर तडवी गल्ली, जळगांव यास ताब्यात घेवून त्याचे कडून २०००/- रु.कि.ची एकूण ८२ सेमी लांबीची मुठ सहीत एक लोखंडी तलवार तिच्या पात्याच्या लांबी ६२ सेमी व मुठ २० सेमी ची असून मुठेला स्टिलच्या पत्र्याचे गोल आवरण असलेली तिचे पाते ३ सेमी रुंदीचे असून निमूळत्या आकाराची व एक तलवार ठेवण्याचे आवरण लाकडी असलेले तिच्यावर पिवळया रंगाचा फाटलेला कपडयाचे आवरण असलेली जप्त करण्यात आली असून सदर बाबत सविस्तर पंचनामा करुन रामानंगर पो.स्टे.ला रिपोर्टाने हजर करण्यात आले आहे. सदर आरोपीतावर श्रीगोंदा पो.स्टे. जि. अहमदनगर येथे २०२० मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.