नौकरी मधील सहकारी यांनी विश्वासात घेवून ३० लाख रुपयाकरीता घात केलेल्या आरोपीतांना स्थागुशा जळगाव पथकाने घेतले ताब्यात.

नौकरी मधील सहकारी यांनी विश्वासात घेवून ३० लाख रुपयाकरीता घात केलेल्या आरोपीतांना स्थागुशा जळगाव पथकाने घेतले ताब्यात.

जळगाव तालुका पो.स्टे. मिसिंग नं. ६१/२०२४ मधिल बेपत्ता महिला स्नेहलता संजय चुबळे, वय ६० रा.धनश्री नगर मोबाईल टावर समोर खोटेनगर जळगाव हि दिनांक २०/०८/२०२४ रोजी स्टेट बँकेतून ३० लाख रुपये घेवून गेली असले बाबत मिसिंग दाखल करण्यात आली होती. सदर मिसिंग दाखल होवून १० दिवस झाल्यानंतर देखील सदर महिला शोध लागत नसल्याने तिचे घरची मंडळी वडील व भाऊ हे मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांना भेटल्या मुळे सदर मिसिंगचे चौकशी कामी मा.श्री बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक स्थागुशा जळगाव यांना आदेश दिले होते.

त्यावरून बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक स्थागुशा जळगाव यांनी सफौ विजयसिंग पाटील, पोह जितेंद्र पाटील, पोह सुधाकर अंभोरे, पोह अकरम शेख, पोह महेश महाजन, पोह लक्ष्मण पाटील, पोना राहुल पाटील, भारत पाटील सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांचे पथक तयार करून सदर मिसिंग मधील संशयीत यांना विचारपुस करणे बाबत आदेश दिलेत.

त्यावरुन संशयीत इसम १) जिजाबराव अभिमन्यु पाटील, वय ४८, व्यवसाय- कनिष्ठ लिपीक, जिल्हा परिषद प्राथमीक आरोग्य विभाग साळवा ता. धरणगाव रा. मुंदडा नगर अमळनेर, जिल्हा परिषद लिपीक संघटना जिल्हाध्यक्ष २) विजय रंगराव निकम, वय ४६, व्यवसाय लिपीक, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद अमळनेर रा.भालेराव नगर अमळनेर जिल्हा परिषद लिपीक संघटना उपाध्यक्ष यास विश्वासात घेवून विचारपुस केल्या नंतर साधारण १२ तासा नंतर नमुद दोघांनी कबुली दिली की, सदर मिसिंग मधील महिला स्नेहलता संजय चुबळे, वय ६० रा.धनश्री नगर मोबाईल टावर समोर खोटेनगर जळगाव हिस जिजाबराव पाटील याने नाशिक येथे २८ लाखात फ्लॅट घेवून देतो असे विश्वासात घेवून तिला तिचे रिटायरमेंट नंतर बँकेत एफ.डी. केलेले ३० लाख रुपये काढून तिला विजय निकम व जिजाबराव पाटील यांनी त्याचे हुन्डाई कंपनीची क्रिटा गाडी मध्ये घेवून जावून तिच्या गळयातील स्कार्प ने तिचा गळा दाबून तिला जिवेठार मारून तिचे प्रेत प्लॅस्टीकच्या गोणी मध्ये टाकून शिरपुर येथील तापी नदीत टाकल्याचे सांगीतले आहे. त्यावरून जळगाव तालुका पो.स्टे.ला जळगाव तालुका पो.स्टे. CCTNS NO ३१२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१),६१ (२),२३८,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदर महिलचे प्रेत शोधणे कामी स्थानिक गुन्हे शाखेची एक टिम ही सतत ३ दिवसापासुन शिरपुर, नरडाणा, सांरगखेडा, शहादा, प्रकाशा असे धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शोध घेत आहेत.

सदर मिंटीगकामी डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, संदिप गावीत, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

  • Related Posts

    पुण्यात ‘मुळशी पॅटर्न, कॉलेजला जात असताना. हडपसरमध्ये खळबळ.

    पुण्यात रामटेकडी परिसरात अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. हत्या पूर्ववैमनस्यातून केली गेली. मृत मुलगा बारावीत शिकत होता. वानवडी पोलिसांनी केस नोंदवून दोन आरोपींना अटक केली…

    संभाजीनगरमधील ‘त्या’ हत्येचं आरोपींनी सांगितलं कारण. भेटायला मैदानात बोलावलं, गळ्यात हात टाकताच पोटात चाकू भोसकला.

    दिनेशचा खून झाल्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती मिळताच खून करून आरोपींनी पसार होण्याचा प्लॅन केला. हर्सूल जेल समोरील मैदानावर २६ वर्षीय तरुणाच्या खुनामुळे शहरात एकच…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.