दिनांक. 03/09/2024 रोजीचे संध्याकाळी 06.00 वाजता ते दिनांक 06/09/2024 रोजीचे सकाळी 09.00 वाजेच्या दरम्यान हजारे कॉलनी, देवपूर, धुळे येथे गणेश नारायण पाटील वय 28 वर्ष व्यवसाय साऊंड सिस्टीम चालक राहणार, हजारे कॉलनी, देवपूर, धुळे यांचे राहते घराचे अनोळखी चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करुन 1,80,000/-रुपये किंमतीचे साऊंड सिस्टीमचे किंमती सामान चोरुन नेले होते त्यावरुन गणेश नारायण पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. 322/2024बी.एन.एस. कलम 331 (3), 331(4), 305 प्रमाणे गुन्हयाची नोंद आहे.

सदर गुन्हयाचे तपासात पोलीस अधीक्षक धुळे, श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक, किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक . एस. ऋषीकेश रेड्डी, धुळे शहर विभाग, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही सहा. पोलीस निरीक्षक तुषार देवरे व पोलीस ठाणेचे अधीनस्त पोलीस उपनिरीक्षक ए.टी. सोनवणे, शोध पथकाचे अंमलदार पोहेकों/ मनोज साठे, पोकॉ/सुनिल राठोड, पोकॉ/ किरणकुमार सावळे, पोकों/अतुल जाधव, पोकों/ गौतम शिरसाठ यांनी विशेष मोहिम राबवून पोलीस ठाणे हद्दीतील गुप्त बातमीदार यांना कार्यान्वित केले होते.











