संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरामध्ये 187 जणांचे रक्तदान.

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरामध्ये 187 जणांचे रक्तदान.

खामगांव संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन, खामगांव या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 187 जणांनी रक्तदान केले आहे.  या शिबिरासाठी प्रमुख अतिथी शिवाजी नगरचे ठाणेदार तसेच अध्यक्षस्थानी मुक्तेश्वर आश्रम चे प्रमुख उपस्थित होते. स्थानिक संयोजक यांनी उपस्थित मान्यवर तसेच रक्तदात्यांचे स्वागत केले. संत निरंकारी मिशनच्या माध्यमातुन मानवतेच्या कल्याणार्थ वेळोवेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजित करण्यात येतात. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, नैसर्गिक संकटाच्या वेळी सहायता आदी सेवांचा समावेश आहे. आपण मानव आहोत. रक्तदान करणे हे आपले मानवीय कर्तव्य आहे. रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण दुसऱ्या व्यक्तीशी रक्ताचे नाते जोडू शकतो असा सुदंर संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी रक्त संकलन जिल्हा शासकीय रूग्णालय खामगाव ब्लड बँक यांच्या माध्यमातून करण्यात आले. या शिबिरासाठी खामगांव तसेच आजुबाजूच्या परिसरातील युवकांनी भरभरून रक्तदान करून मानवतेच्या या महान यज्ञरूपी कार्यामध्ये आपले अतुलनीय योगदान दर्शविले.

  • Related Posts

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    राजकारणाचा बाजार? ‘मतदार राजा’ कुठाय? संजय सुतार..

    राजकारणाचा बाजार? ‘मतदार राजा’ कुठाय? संजय सुतार विषेश प्रतिनिधी- शिवानंद पांचाळ नायगांवकर नेत्यांनी रोजच राजकारणाचा बाजार मांडायचा आणि आम्ही त्यांच्या तालावर नाचायचं असं अजून कुठंवर चालणार? याचं कोडं काय सुटेनासं…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.