‘खैके पान बनारस वाला’वर डान्स; चार पोलिस निलंबित: नागपुरात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर नृत्य
नागपूर – स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर तहसील पोलिस ठाण्याच्या आवारात ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नृत्याचा ठेका धरणारे दोन पोलिस कर्मचारी आणि दोन महिला अंमलदार अशा चारही कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटणकर, पोलिस हवालदार अब्दुल गनी, पोलिस शिपाई डॉली ऊर्फ भाग्यश्री गिरी आणि निर्मला गवळी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे असल्याचे सांगण्यात आले आहे.











