थोरल्याशी वाद, धाकल्याचा काटा काढला! रॉडनं मारहाण करत युवकाला संपवलं, 6 आरोपींवर गुन्हा दाखल.

अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. थोरल्याशी वाद असल्याने 6 नराधमांनी धाकट्या भावाचा खून केला आणि त्याचा मृतदेह वनीकरणाजवळ रस्त्याच्या कडेला फेकून दिला.अहिल्यानगर जिल्ह्यातील गणेश नगर (ता. राहता) येथील एका तरुणाशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून सहा तरुणांनी त्याच्या १९ वर्षीय भावाचे अपहरण करीत लोखंडी रॉडने त्यास मारहाण करीत त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली. प्रतीक वसंत सदाफळ (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून आणत सिन्नर-शिर्डी महामार्गावर सामाजिक वनीकरणाजवळ रस्त्याच्या कडेला तो फेकून दिला. सोमवारी (दि.१४) सकाळी ९ वाजेच्या सुमारास या घटनेचा उलगडा झाला. सिन्नर याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

प्रतीक याचे शनिवारी (दि.१२) रात्री ११ वाजेच्या सुमारास गणेशनगर येथील निर्मळ हॉस्पीटलसमोरून अपहरण करण्यात आले. त्याला संशयितांनी सिल्व्हर रंगाच्या कारच्या डिक्कीत टाकून लांबवर नेत लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जीवेठार मारले. त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात वनीकरणात नालीच्या पायथ्याशी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकून दिला. सोमवारी या परिसरात शेळ्या चारणाऱ्यास सकाळीच नऊ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला हा मृतदेह दिसल्यानंतर त्याने मुसळगाव पोलिसपाटलांना या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली.

याप्रकरणी मयत प्रतीकचा भाऊ रितेश सदाफळ याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात भावाचा खून झाल्याची फिर्याद दिली.पोलिसांनी रितेश सदाफळ याच्या फिर्यादीहून संशयित प्रशांत ऊर्फ बाबू जनार्दन जाधव (रा. शिर्डी), अक्षय पगारे (रा. शिर्डी), चंदू तहकीत (रा. सावळीविहीर ता. राहाता), ओमकार शैलेश रोहम (रा. राहाता), प्रवीण वाघमारे (रा. कालिकानगर, शिर्डी) व सोनू पवार (रा. सावळीविहीर ता. राहाता) या सहा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.रितेश सदाफळ (वय २२) आणि संशयित सहाजण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद होते. हे सहाही जण रितेशच्या मागावर होते. त्याचा लहान भाऊ प्रतीकचे अपहरण केल्यानंतर रितेश आपोआप जाळ्यात येईल, तिथेच त्याचा ‘गेम’ वाजवण्याचा संशयितांचा ‘प्लॅन’ होता. मात्र, रितेश त्या प्लॅनमध्ये फसला नाही, परिणामी राग अनावर झाल्याने संशयितांनी प्रतीकचा काटा काढला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.