चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली दोन्ही पत्नींना बेदम मारहाण, पत्नींनी घरातून पळ काढत गाठले चुलत्याचे घर.

छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव बुद्रुकमध्ये राजू भालेराव याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या दोन्ही पत्नींना बेदम मारहाण केली. १२ एप्रिल रोजी रात्री घडलेल्या या घटनेनंतर, पीडित महिलांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राजू भालेरावला ताब्यात घेतले आहे.चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या दोन्ही पत्नींना मारहाण केल्याची घटना आडगाव बुद्रुक येथे मंगळवारी घडली. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून राजू किसन भालेराव (रा. आडगाव बुद्रुक, छत्रपती संभाजीनगर) याच्याविरोधात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये.या प्रकरणी २२ वर्षीय महिलेने तक्रार दिली.

चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आडगाव बुद्रुक येथे पीडित विवाहिता पती राजू भालेराव, तिचा चार वर्षांचा मुलगा, दीड वर्षांची मुली यांच्यासह तिची सवत आणि तिच्या एक वर्षाच्या मुलीसह सासूसोबत एकत्रित राहते. १२ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान तक्रारदार महिलेच्या सवतीला राजू याने चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण केली. तो पत्नीला इतकी जास्त मारहाण करत होता की, पहिल्या पत्नीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी पहिल्या पत्नीला देखील त्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. दोघींनाही त्याने बेदम मारहाण केली. १२ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान मारहाणीची घटना घडली. या मारहाणीमुळे घाबरलेल्या दोन्ही पत्नींनी घरातून पळ काढत चुलत्याकडे रात्र काढली.

मात्र, पतीची दहशत त्यांच्या मनात बसली होती. सकाळ होताच दोघींनीही थेट चिकलठाणा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.या माहितीवरून चिकलठाणा पोलिसांनी राजू भालेराव याला ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणले, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपी पती राजू भालेराव याची चाैकशी ही पोलिसांकडून केली जात आहे. राजू भालेराव हा दुसऱ्या पत्नीला चरित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत होता. तिला सोडवण्यासाठी पहिली पत्नी आली आणि तिला देखील त्याने मारहाण केले. या मारहाणीत दोघींनाही जास्त मार लागल्याची देखील माहिती मिळतंय.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.