पाण्यासाठी उपसरपंचाला तीन तास कार्यालयात कोंडले; यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांचा संताप.

वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याने मंगळवारी गावकऱ्यांनी उपसरपंच, सदस्यांसह कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीत कोंडले.उमरखेडपासून चार किलोमीटर अंतरावरील चुरमुरा गावातील पाणीपुरवठा काही दिवसांपासून खंडित असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने मंगळवारी गावकऱ्यांनी उपसरपंच, सदस्यांसह कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीत कोंडले. काही गावकऱ्यांनी परिसरातील झाडाला गळफास घेण्याचाही प्रयत्न केल्याने वातावरण तापले होते.चुरमुरा गावात गेल्या तीन वर्षांपासून जलजीवन योजनेंतर्गत कामे सुरू आहेत.

गावात विहीर खोदून पाइपलाइन टाकण्यात आली आहे. विहिरीवर मोटार बसविण्यात आली नसल्याने पाणीपुरवठा सुरू झाला नाही. मंगळवारी सकाळी महिलांनी घागर मोर्चा काढत ग्रामपंचायतीसमोर ठाण मांडले. काही गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे दार बाहेरून बंद केले. पाच तासांनंतर बाहेर आलेले उपसरपंच अर्जुन जाधव यांनी पाणीटंचाईसाठी सरपंच आणि सचिव जबाबदार असल्याचा आरोप केला.आंदोलनाची माहिती मिळताच उमरखेडचे गटविकास अधिकारी किरण कोळपे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी यंत्रणा दुरुस्तीचे आदेश दिले.

सहा दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले. त्यानंतर गावकऱ्यांनी पाच तासांनंतर आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाच्या निमित्ताने पाणीटंचाईचा प्रश्न चर्चेला आला आहे.आंदोलनाची माहिती मिळताच उमरखेडचे गटविकास अधिकारी किरण कोळपे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी यंत्रणा दुरुस्तीचे आदेश दिले. सहा दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले. त्यानंतर गावकऱ्यांनी पाच तासांनंतर आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाच्या निमित्ताने पाणीटंचाईचा प्रश्न चर्चेला आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.