अरे चेतन हळू चालव ना! प्रवाशांची गयावया, तरी चालकाने गाडी दामटवली; मुंबईत भीषण अपघातात दोघांचा मृत्यू.

ईस्टर्न फ्रीवेवर त्याने कारचा वेग वाढवला. प्रवासी गाडीचा वेग कमी करण्याची विनंती करत होते मात्र तो ऐकला नाही. भरधाव वेगात असल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळून पलटी झाली.ईस्टर्न फ्रीवेवर शिवडीजवळ सोमवारी एका मारुती इको कारने दुभाजकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. रामजी जयस्वार (६०) आणि विनोद रामा वैद्य (५२) अशी मृतांची नावे असून जखमींमध्ये गीता राजभर, खुशबू राजभर, सुलेखा वैद्य आणि चेतन नंदू पाटील यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन पाटील हा इको कार चालवत होता. सहा जणांना घेऊन तो ठाण्याहून मुंबईच्या दिशेने मासे खरेदीसाठी येत होते. कारमधील सर्व प्रवासी दक्षिण मुंबईतील बाजारात मासे खरेदी करून त्यांची ठाण्यात विक्री करतात.

सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो निघाला. ईस्टर्न फ्रीवेवर त्याने कारचा वेग वाढवला. प्रवासी गाडीचा वेग कमी करण्याची विनंती करत होते मात्र तो ऐकला नाही. भरधाव वेगात असल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळून पलटी झाली.या अपघाताची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या रामजी, विनोद, गीता, खुशबू, सुलेखा आणि चेतन यांना रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर दुखापत झाल्याने रामजी आणि विनोद यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर इतर चौघांवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुसरीकडे, यवतमाळ येथे दाल मिलमधील फिल्टरचे रॉड कोसळून तीन मजुरांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना यवतमाळ एमआयडीसीत मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. भावेश कडवे रा. वर्धा, मुकेश काजले व सुरेश काजले दोघेही राहणार खंडवा (मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहे. तर दिलीप व करणसिंग दोघेही रा. खंडवा अशी जखमींची नावे आहेत.यवतमाळ शहराजवळील एमआयडीसी परिसरात दाल मिल आहे. या मिलमध्ये हे मजूर काम करीत असताना डाळ फिल्टर करणाऱ्या मशीनचे रॉड अचानक तुटून तुटले. हे वेगाने धडकल्याने तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास लोहारा पोलिस करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.