लाडकी बहीण योजना बंद केली जाणार, आदित्य ठाकरेंचा दावा, सत्ताधाऱ्यांचा प्लॅन सांगितला.

शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात संवाद साधताना त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यामध्ये करण्यात येत असलेल्या कपातीवर भाष्य केले तसेच ही योजना लवकरच बासनात कशी गुंडाळली जाणार याचा प्लॅनही सांगितला.शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा नाशिक येथे पार पडत आहे. या निर्धार मेळाव्यात पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले त्यात त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यामध्ये करण्यात येत असलेल्या कपातीवर भाष्य केले तसेच ही योजना लवकरच बासनात कशी गुंडाळली जाणार याचा सत्ताधाऱ्याचा प्लॅनही सांगितला.100 दिवस झाले या सरकारने एकतरी चांगली योजना आणली का असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. त्यानंतर पुढे म्हणाले की, लाडकी बहीण योजना 500 रुपयांवर आली. आपण तर 3000 रुपये देणार होतो. पण भाजप असेल, एसंशि असेल, दादांचा गट असेल या सर्वांनी गावागावात जाऊन सांगितले होते की तुम्हाला आम्ही 2100 रुपये देऊ.

अजून महिला वाढतील.एक वेगळी कातडी लागते. एक वेगळा निर्लज्जपणा लागतो कारण तुमचं एवढ बहुमताचे सरकार आल्यानंतरही तुमच्या जाहीरनाम्यातील एकसुद्धा गोष्ट बजेटमध्ये आणत नाहीत.लाडकी बहीण योजेनेतून 8 लाख महिला कमी केल्याची बातमी पाहिली. अडीच कोटी महिलांना लाभ मिळेल असे सांगत होते. आता अडीच कोटीवरून 50 लाख महिला कमी करणार आहेत. काही महिलांच्या खात्यात पैसे गेलेत ते परत घेतले जात आहेत. तर काही महिलांवर पोलिस कारवाई देखील करणार आहेत. ठाकरेंनी सत्ताधारी लाडकी बहीण योजना बंद करणाचा दावा केला त्याचा प्लॅनही सांगितला, ते म्हणाले की, तुम्ही लिहून घ्या यांचेच कोणीतरी कोर्टात जाईल.

आणि कोर्टात जाऊन हेच लोक ही योजना बंद करतील. लाडकी बहीण योजना बंद करतील. यांना कोणतेही देणघेण नाही. यांना काही लाज राहिलेली नाही.आदित्य ठाकरेंनी पुण्यातील एसटी बलात्कारवरील गृहराज्यमंत्र्यांच्या विधानावर जोरदार टीका केली. बीड परभणी प्रकरणावरूनही सरकारला धारेवर धरले. बीडमधील आका कोण आहे सर्व महाराष्ट्राला कळले. पण फोटो आल्यानंतरच मंत्रि‍पदाचा राजीनामा घेतला.अगोदर कारवाई का केली नाही. मुख्यमंत्री आपल्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकले नाहीत. भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या हत्या होत असतील आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर आपण करायचे तरी काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.