मंगेशकर कुटुंबीयांकडून देण्यात येणाऱ्या ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारा’ची घोषणा.

मंगेशकर कुटुंबीयांकडून देण्यात येणाऱ्या ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली असून यावर्षी हा पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे.यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे. मंगेशकर कुटुंबीयांनी परिपत्रकाच्या माध्यमातून पुरस्कारांची घोषणा केली आहे. तर इतर पुरस्कारार्थींमध्ये श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, सोनाली कुलकर्णी यांचा समावेश आहे.
दरम्यान, मंगेशकर कुटुंब गेल्या ३४ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत.

मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.तर कुमार मंगलम बिर्ला हे भारतातील बड्या उद्योगपतींपैकी एक आहेत. आदित्य बिर्ला समूहाचे चौथ्या पिढीचे ते प्रमुख आहेत. वडील आदित्य विक्रम बिर्ला यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी १९९५ मध्ये वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली होती.तर भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर ‘लता दीनानाथ मंगेशकर’हा पुरस्कार त्यांच्या स्मरणार्थ दिला जातो.

या पुरस्काराचे पहिली मानकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठरले होते. त्यानंतर हा पुरस्कार आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला होता. तर तिसऱ्या वर्षी महानायक अमिताभ बच्चन यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.मंगेशकर कुटुंबीयांनी यंदा पत्रकार परिषद न घेता परिपत्रकाच्या माध्यमातून घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ रुग्णालयाचा वाद सुरू असल्यानं मंगेशकर कुटुंबीयांनी पत्रकार परिषद न घेण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.