“ह्याला जरा आवरा ना!”, घरमालकाकडे दारुड्याची तक्रार, संतापाच्या भरात तरुणीला पेटवलं, क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्यामुळे जीवाच्या आकांताने रमिथाने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत घटनास्थळी आले आणि त्यांनी आग विझवली. गंभीर जखमी झालेल्या रमिथाला तातडीने मंगळूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. ५० टक्के भाजल्यामुळे रमिथाचा मंगळवारी मृत्यू झाला.दारुड्या शेजाऱ्याचा त्रास होतो म्हणून घरमालकाला तक्रार करणाऱ्या महिलेला संतापलेल्या शेजाऱ्याने पेटवून दिले. यात महिलेचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेने घरमालकाकडे शेजारी राहणाऱ्या एका पुरूषाबद्दल तक्रार केली होती, जो दारू पिऊन दररोज तिच्याशी भांडत असे. यानंतर त्या पुरूषाला महिलेचा राग येऊ लागला. एवढेच नाही तर सूडाच्या भावनेने त्याने महिलेवर पेंट थिनर ओतले आणि तिला पेटवून दिले.

ही भयानक घटना केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील मन्नादुक्कम येथे ८ एप्रिल रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमिथा नावाची स्थानिक रहिवासी किराणा दुकान चालवत होती. तामिळनाडूतील रामामृतम नावाचा एक व्यक्ती रमिथाच्या दुकानाशेजारी फर्निचरचे दुकान चालवतो. काही दिवसांपूर्वी पीडित रमिथाने आरोपी रामामृतम रोज दारु पिऊन धिंगाणा घालतो. व आपल्याशी भांडतो अशी तक्रार राममृतम राहत असलेल्या घराच्याघरमालकाकडे केली.दारूच्या नशेत त्याने तिचा छळ केल्याचा आरोप महिलेने केला. रमिथाने केलेल्या तक्रारीवरून, घरमालकाने रामामृतमला ताकीद दिली व तो जर असेच करत राहिला तर त्याला घर रिकामे करावे लागेल असा इशाराही दिला. यामुळे राममृतमच्या मनात रमिथाबद्दल द्वेष निर्माण झाला.

त्याला कोणत्याही परिस्थितीत तीचा बदला घ्यायचा होता. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ८ एप्रिल रोजी रामामृतमने किराणा दुकानात बसलेल्या रमिथावर रंगात मिसळण्यासाठी वापरले जाणारे थिनर ओतले आणि तिला आग लावली.अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्यामुळे जीवाच्या आकांताने रमिथाने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत घटनास्थळी आले आणि त्यांनी आग विझवली. गंभीर जखमी झालेल्या रमिथाला तातडीने मंगळूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. ५० टक्के भाजल्यामुळे रमिथाचा मंगळवारी मृत्यू झाला. आरोपी राममृतमने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.