
विधानसभा निवडणुकीतील अपयश धुवून काढत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी नवी उभारी देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच नाशिकमध्ये शिबिर घेत आहेत.एकवेळ राजकारण सोडून घरी बसू. पण शिवसेना सोडणार नाही. जगेन तर शिवसेनेसोबत अन् मरू तर शिवसेनेसाठी, अशी भावना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात पुन्हा सेनेचा भगवा फडकावण्याचा निर्धार चर्चा सत्रातून व्यक्त करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते निर्धार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष करण्यात आला.विधानसभा निवडणुकीतील अपयश धुवून काढत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी नवी उभारी देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच नाशिकमध्ये शिबिर घेत आहेत.
शिवसेनेला सत्तेत आणण्यात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकमध्ये अधिवेशन घेऊन पक्षाला उभारी दिली होती. त्याचाच कित्ता उद्धव ठाकरे गिरवणार आहेत.आज, बुधवारी (दि.१६) नाशिकमध्ये होणाऱ्या निर्धार शिबिरात पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणार आहेत. शिवसेनेला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शिबिर महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे.शिवसेनेत फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला बळ मिळाले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर पक्षाला गळती लागली.
नाशिकमधील ३५ पैकी २० माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे विधानसभेत आलेले अपयश व पक्षातील गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे नाशिकच्या रिंगणात उतरणार आहेत.उद्धव ठाकरेंसह युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही शिबिरात मार्गदर्शन करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करणार आहेत. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे यापूर्वी कधी न ऐकलेले भाषण दाखविले जाणार आहे, हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य. पक्षासाठी कायदेशीर लढाई लढणारे ॲड. असीम सरोदे, खासदार राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे मार्गदर्शन करतील.
Video Player
00:00
00:00