
शहरातील अभ्यासिका आणि कोचिंग क्लासची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. या अभ्यासिका, क्लास सुरू करताना त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या ‘फायर एनओसी’सह इतर परवानग्या घेतलेल्या आहेत का, संबंधित ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था आहे का, ती इमारत सुरक्षित आहे का, या सर्व गोष्टी तपासण्याची सूचना पोलिस आयुक्तांनी स्थानिक पोलिस ठाण्यांना केली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून परीक्षा पुढे ढकलण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलने होत असून, त्यांना काही खासगी ‘कोचिंग क्लास’ व अभ्यासिका चालकांची फूस असल्याच्या तक्रारी पुणे पोलिसांकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. काही क्लासचालकांना मंगळवारी पोलिस आयुक्त कार्यालयात बोलावण्यात आले होते.’एमपीएससी’ उमेदवारांनी नुकतेच फरासखाना पोलिस ठाण्याच्या परिसरात आंदोलन केले. एमपीएससीची परीक्षा पद्धती, अभ्यासक्रमातील बदल; तसेच नियुक्त्यांच्या प्रक्रियेतील विलंब यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. त्यासाठी अनेक आंदोलने झाली.
मात्र, ती आंदोलने केवळ विद्यार्थ्यांच्या भावनांचा उद्रेक नसून, त्यामागे काही खासगी कोचिंग क्लास चालक आणि अभ्यासिका चालवणाऱ्यांचा हेतुपुरस्सर हस्तक्षेप असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता, काही संशयितांची नावे पुढे आली. संबंधित अभ्यासिका व क्लासच्या व्यवहारांची छाननी सुरू आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांनीही योग्य मार्गाने आपल्या मागण्या मांडाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.शहरातील अभ्यासिका आणि कोचिंग क्लासची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. या अभ्यासिका, क्लास सुरू करताना त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या ‘फायर एनओसी’सह इतर परवानग्या घेतलेल्या आहेत का, संबंधित ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था आहे का, ती इमारत सुरक्षित आहे का, या सर्व गोष्टी तपासण्याची सूचना पोलिस आयुक्तांनी स्थानिक पोलिस ठाण्यांना केली आहे.विद्यार्थ्यांचे आंदोलन हे त्यांच्या मागण्यांसाठी असले पाहिजे.
मात्र, त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. काही संशयित संस्थांची नावे आमच्या तपासात पुढे आली आहेत. दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. अमितेश कुमार, पोलिस आयुक्त१. संयुक्त गट ब व क २०२४ परीक्षेच्या जागावाढ २. एक्साईज एसआय (Excise – SI) या पदाच्याही जागा वाढल्या पाहिजेत ३. सर्व परीक्षा वेळेवर झाल्या पाहिजेत. ४. राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक नको, अशी मागणी बहुतांश विद्यार्थी करत आहेत. ५. आयोगा कारभार व्यवस्थित चालवावा, त्यामुळे परीक्षांवर परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जात आहे. आयोगातील काही अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचाही आरोप परीक्षार्थींनी केला आहे. ६. क्लर्क परीक्षेचा निकाल लवकर लागावा. ७. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी EWS विद्यार्थ्यांना उशिरा अर्ज करण्यासाठी लिंक उघडून दिली. त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे परीक्षेची तारीख पुढे ढकलावी.
Video Player
00:00
00:00