ठाकरे गटात ठिणगीचा वणवा, अंबादास दानवेंच्या तक्रारीसाठी चंद्रकांत खैरे ‘मातोश्रीवर’, उद्धव ठाकरेंकडे दाद मागणार.

 ​​‘विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवार ठरवताना मला विचारणा करण्यात आली नाही. आता जिल्ह्यात पक्षाची जी कमकुवत अवस्था झाली आहे, त्यास अंबादास दानवे हेच जबाबदार आहेत, अशा आरोपांचा चंद्रकांत खैरे यांनी पुनरुच्चार केला.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत वादाने टोक गाठल्याचे पाहायला मिळत आहे. कारण छत्रपती संभाजनगर येथील ठाकरे गटाचे दोन बडे नेते म्हणजेच माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील वादाच्या ठिणगीने रौद्र रुप धारण केलं आहे. दानवेंची तक्रार करण्यासाठी खैरेंनी थेट मुंबई गाठली आहे. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट देऊन खैरे दानवेंची तक्रार करणार असल्याची माहिती आहे. आता या भेटीत तोडगा निघणार की टोक गाठलं जाणार, हे भेटीनंतर स्पष्ट होणार आहे.

‘छत्रपती संभाजनगर शहरातील पाणीबाणीविरोधात प्रशासनाला जाब विचारण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीचे मला आमंत्रण नव्हते. माझ्याकडे विचारणा केली जात नाही. वारंवार असे होते. याबाबत मी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पक्षाच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे’, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी म्हटले. तर, ‘ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याविरुद्ध मी कसे बोलणार ? त्यांना तक्रार करायची असेल तर करू शकतात. पक्षप्रमुख जे सांगतील ते मी ऐकायला तयार आहे’, असे अंबादास दानवे यांनी सांगितले होते.

‘विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवार ठरवताना मला विचारणा करण्यात आली नाही. आता जिल्ह्यात पक्षाची जी कमकुवत अवस्था झाली आहे, त्यास अंबादास दानवे हेच जबाबदार आहेत. निवडणुकांमध्ये उमेदवार ठरवतानाही मतांचा विचार केला गेला नाही’, या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केला.‘पक्षाच्या बैठकीचे मला आमंत्रण नव्हते. माझ्या समाजाचा नागपूरमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम होता. दोन महिने आधी ठरला होता. तिथे माझ्याकडून दोन आमदारांचे सत्कार होते. मी तिकडे गेले होतो. बैठकीची माहिती मला आधी दिली गेली नाही, ’, असे खैरे यांनी नमूद केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.