जातीय वक्तव्य करणे निलंबित पीएसआय रणजीत कासले यांच्या अंगलट, अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना.

बीडमधील सायबर पोलीस ठाण्याचे निलंबित पीएसआय रणजीत कासले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोशल मीडियावर जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेसाठी पथक रवाना झाले असून, यापूर्वी कोट्यवधीच्या डील प्रकरणी ते निलंबित झाले होते.बीड येथील सायबर पोलीस ठाण्यातील निलंबित पीएसआय रणजीत कासले हे मागील काही दिवसांपासून अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करत आहेत. बऱ्याच व्हिडीओमध्ये ते मध्यप्राशन करून बोलताना दिसतात. व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी काही गंभीर आरोप देखील केली आहेत. कासले यांचा एक वादग्रस्त व्हायरल व्हिडिओवर चर्चेत आहे. याच व्हिडीओमुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसतंय.रणजीत कासले यांनी त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी बीडमधील एका वकिलाच्या फिर्यादीवरून कासले विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेच नाही तर रणजीत कासले याच्या अटकेसाठी एक पथक देखील रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.रणजीत कासले यांची सायबर पोलिस ठाण्यात नियुक्ती होती. मार्च महिन्यात एक आरोपी आणि दोन कर्मचाऱ्यांना घेऊन ते गुजरातमध्ये गेले. तेथे गेल्यानंतर कोट्यवधी रूपयांची डील केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. याची तक्रार येताच पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याची चौकशी केली. त्यानंतर निलंबित करण्यात आले. तेंव्हापासून रणजीत कासले सोशल मीडियावर काही आरोप करत व्हिडीओ शेअर करत आहेत.

वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी व्हिडीओ बनवत ठाणेदार ते अपर पोलिस महासंचालक आणि राजकीय नेत्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. अनेक व्हिडीओमध्ये ते दारू पिल्याचीही कबुली देत आहेत. असाच एक व्हिडीओ बनवत असताना त्यांनी जातीय वक्तव्य करून विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे बीडमधील एका वकिलाने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. रणजीत कासले हे धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना देखील दिसले. आता त्यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. त्यांनी वाल्मिक कराडबद्दल खुलासा केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.