नागपूरच्या पॉश एरियात रेस्टॉरंट मालकाला गोळ्या घालून संपवलं, धरमपेठ हादरलं!

राज्याच्या उपराजधानीत पुन्हा एकदा गोळीबारची घटना घडली आहे.  नागपुरातील या गोळीबाराच्या घटनेत एकाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहेराज्याच्या उपराजधानीत पुन्हा एकदा गोळीबारची घटना घडली आहे.  नागपुरातील या गोळीबाराच्या घटनेत एकाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील पॉश समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरात गोळी झाडून एकाची हत्या करण्यात आली आहे.  शोशा लाउंज एंड रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी (वय 28) यांच्यावर गोळी झाडून ही हत्या करण्यात आली आहे.  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठलं आणि पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र गोळीबाराच्या या घटनेने शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोकुळपेठ बाजार परिसरातील शोशा लाउंज एंड रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी (28 वर्ष) हे रात्री मित्रांसोबत बसले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चार आरोपी दोन मोटरसायकलवरून त्यांची जवळ आले आणि त्यांच्यावर गोळीबार केला.

गोळीबारानंतर उपचारासाठी अविनाश भुसारी यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. मात्र ही हत्या नेमकी कुणी आणि कुठल्या कारणातून झाली हे अद्याप कळू शकलेलं नाहीयेत्यामुळे पोलीस तपासात पुढे नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.गँगवॉरच्या जुन्या वैमन्यस्यातून नागपूरमध्ये अविनाश भूसारी याचे हत्याकांड घडले असावे, असा प्राथमिक अंदाज अंबाझरी पोलिसांनी व्यक्त केला आहे . रात्री 1 वाजताच्या दोन दुचाकीवरून चार आरोपी आले. त्यांनी मित्रांसोबत बसलेल्या अविनाशवर सहा राऊण्ड फायर केला व पसार झाले. आरोपींची ओळख पटली असून आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत यांनी सांगितले.

मौज मजेसाठी सोनसाखळी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी भांडाफोड केलाय. तसेच या टोळीकडून चारीचे सोन खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून जवळपास आठ तोळे चारीचे सोनं हस्तगत केलंय. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसात तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या यानंतर गंगापूर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत सोन साखळी चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे.यामध्ये तीन अल्पवयीन मुलासंह तिघांचा समावेश आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागडे मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी चोरी करायचे दरम्यान पोलिसांनी या टोळी कडून ११ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये नाशिक शहरातील सात तर पुणे जिल्ह्यातील तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.