बीडमधील ‘आवादा’ कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पातून तांबे चोरणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षा रक्षकांना बांधून ही चोरी करण्यात आली होती. पोलिसांनी 11,58,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, खंडणीच्या आरोपानंतर ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आरोपी धाराशिव जिल्ह्यातील आहेत.’आवादा’ कंपनीच्या पनवचक्की प्रकल्पावर सुरक्षारक्षकांना बांधून घालून तेथून तांबे चोरून नेणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ११,५८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आवादा कंपनी चर्चेत असतानाच तिथे चोरीची घटना घडल्याने मोठी खळबळ निर्माण झाली.










