
जि प शाळा मोहमांडली नवी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक यांनी महामानव डॉ बाबासाहेब यांच्या जीवन कार्याबद्दल मुलांना माहिती सांगितली. तसेच ग्रामपंचायत सदस्य, युवा स्वयंसेवक, भीम आर्मी चे तालुका उपाध्यक्ष जूम्मा तडवी सर यांनी डॉ. बाबासाहेब यांनी सांगितलेले शिक्षणाचे महत्त्व मुलांना पटवून दिले. तसेच शिक्षक विनोद पाचपोळे सर यांनी बाबासाहेब यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगून आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी पण बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक विनोद बाविस्कर सर, भीम आर्मीचे तालुका उपाध्यक्ष तथा युवा ग्रामपंचायत सदस्य जुम्मा तडवी सर, शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य, नागरिक तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शिक्षक विनोद पाचपोळे सर यांनी व्यक्त केले.