पहलगामला जाणाऱ्या मुंबईकर कुटुंबाचा जीव रस्ता खचल्याने वाचला, अन्यथा दहशतीच्या हल्ल्यात ते सापडले असते.

जम्मू-काश्मीरमध्ये गेलेले प्रवासी पहलगामजवळ रस्ता खचल्याने बचावले. रस्ता खचला नसता, तर मोठी दुर्घटना घडली असती, असा अनुभव पर्यटकांनी सांगितला. भारतीय लष्कराच्या जवानांमुळे सुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली, असेही काही पर्यटक म्हणाले.‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी पहलगाम येथे जाणारा रस्ता खचला आणि त्यामुळे आम्हाला पहलगाम येथे जाता आले नाही. पहलगाममध्ये पोहोचलो असतो, तर आज आम्ही जिवंत मुंबईत आलोच नसतो…’ पर्यटक अनुभव सांगत होते. कल्पनेनेही त्यांच्या डोळ्यांत पाणी दाटून आले होते.जम्मू-काश्मीरमधील प्रवाशांना राज्य सरकारने दोन विशेष विमानांनी मुंबईत गुरुवारी आणले. २५२ पर्यटक मुंबईत दाखल झाले. मुंबईहून आठ ई-शिवनेरीने त्यांना स्वगृही सोडण्यात आले. हे प्रवासी मुंबई, भांडुप, वसई रोड, नालासोपारा, शहापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर येथील होते.‘पुण्यातील ३० पर्यटकांसह जम्मूला रेल्वेने पोहोचलो.

यानंतर रस्तेमार्गे श्रीनगर गाठले. श्रीनगरमध्ये पर्यटन केल्यानंतर पहलगामभेटीचे नियोजन होते. मात्र हल्ल्याच्या दोन दिवसाआधी पहलगाम येथे जाणारा रस्ता खचल्याने ही भेट टळली. दरम्यान, पर्यायी मुघल रोडने तेथे पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार केल्याचे समजले. रस्ता खचला नसता, तर हल्ल्याच्या वेळी आमचाही जीव गेला असता,’ असा अनुभव अथर्व टूर्सचे व्यवस्थापक सचिन जाधव यांनी मांडला.‘आमच्यासोबत महाराष्ट्र, गुजरातमधील सर्वाधिक आणि त्यानंतर आसाम, बंगालमधील पर्यटकही होते. हल्ल्यानंतर लष्कराला तातडीने पाचारण केल्याने धीर मिळाला. विमानतळावर पोहोचेपर्यंत सर्व नातेवाईकांचे फोन खणखणत होते. विमानतळावर मोठी गर्दी उसळली होती. राज्य सरकारने विशेष विमान उपलब्ध करून दिले आणि सुखरूप मुंबईत दाखल झालो,’ असे राधाबाई धनकडवे यांनी सांगितले.

‘पहलगामपासून १० किलोमीटर अंतरावर असताना पुढे जाता येणार नसल्याचे सांगण्यात आले. हॉटेलमध्ये पोहोचल्यावरदेखील मनात प्रचंड भीती होती. ही भीती मुंबईत पोहोचल्यावर नाहीशी झाली. भारतीय लष्कराच्या जवानांवर पूर्ण विश्वास आहे. भविष्यात काश्मीरची सहल नक्कीच पूर्ण करू. कारण काश्मीर आपले आहे,’ असे पर्यटक अतुल देशपांडे यांनी सांगितले.पहिले विशेष विमान गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता आणि दुसरे विमान साडेदहाच्या सुमारास आले. पहिल्या विमानामध्ये १७५ पर्यटक आणि दुसऱ्या विमानात ७७ पर्यटक आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवासी वाहतूक विनाअडथळा पूर्ण करण्याचे काम एसटीचालक वरिष्ठाच्या मार्गदर्शनाने सातत्याने करत आहेत. या आधी करोनाकाळात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणणे, अतितीव्र पावसामुळे रेल्वेवाहतूक खोळंबल्यानंतर शहरातून उपनगरात प्रवासी वाहतुकीची जबाबदारी महामंडळाने सुरक्षित पूर्ण केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.