श्रेयस अय्यरचा मास्टर स्ट्रोक, लिलावात अनसोल्ड राहिलेला मुंबईचा खेळाडू पंजाबच्या ताफ्यात.

आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जचा आतापर्यंतचा प्रवास उत्तम राहिला आहे. त्यांनी ८ सामन्यांत ५ विजयांसह १० गुण मिळवले आहेत आणि गुणतालिकेत ५ व्या स्थानावर आहेत. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामन्यापूर्वी, पंजाबने २६ वर्षीय स्टार अष्टपैलू खेळाडूचा संघात समावेश केला आहे.आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जचा आतापर्यंतचा प्रवास उत्तम राहिला आहे. त्यांनी ८ सामन्यांत ५ विजयांसह १० गुण मिळवले आहेत आणि गुणतालिकेत ५ व्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्जने गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचा पराभव केला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील या संघाचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आहे. यापूर्वी, पंजाबने २६ वर्षीय स्टार अष्टपैलू खेळाडूचा संघात समावेश केला आहे. या क्रिकेटपटूला मेगा लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने खरेदी केले नाही.मुंबईचा अष्टपैलू खेळाडू तनुश कोटियनला पंजाब किंग्जने चालू हंगामाच्या मध्यभागी नेट बॉलर म्हणून सामील केले आहे.

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात तो विकला गेला नाही. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला संघाच्या सराव सत्रादरम्यान २६ वर्षीय तनुषला नेटमध्ये पंजाब किंग्जच्या फलंदाजांना गोलंदाजी करताना आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी यांच्याशी गप्पा मारण्यात बराच वेळ घालवताना दिसले.या हंगामात मुंबईला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा कोटियन स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मेगा लिलावात त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नसला तरी, पंजाब किंग्जने नेट बॉलर म्हणून त्याचा समावेश करणे ही तनुष कोटियनसाठी चांगली बातमी आहे.

पंजाब किंग्जच्या सेटअपमध्ये कोटियनला प्रवेश मिळवून देण्यात कर्णधार श्रेयस अय्यरच्या मुंबई कनेक्शनने महत्त्वाची भूमिका बजावली असे मानले जाते. २०२४ मध्ये केकेआरला आयपीएल जेतेपद मिळवून देणारा अय्यर हा संघाला चांगला ओळखणारा खेळाडू आहे. गुरुवारी कोटियन संघात सामील झाला. त्याने नेटमध्ये पंजाबच्या फलंदाजांना काही आव्हानात्मक षटकेही टाकली. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आर. अश्विनच्या जागी तनुष कोटियनला भारतीय कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी मुंबईच्या या अष्टपैलू खेळाडूचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.