मनगटावरचं रक्षा कवच तोडलं, स्थानिक महिलेकडून बुरखा मागितला, मुलांना वाचवण्यासाठी आईने लावली प्राणांची बाजी.

टेकडीवरून खाली उतरताना, त्यांनी पहिलं त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या हातावर बांधलेले रक्षाकवचाचे धागे कापले. अडचणींपासून वाचवण्यासाठी असलेले ते रक्षाकवचाचे धागे त्यांच्यासाठी मृत्यूचा फास बनले होते. दहशतवाद्यांनी त्यांना हिंदू म्हणून ओळखू यासाठी, त्यांनी मनगटावर बांधलेले रक्षाकवचाचे धागे तोडून टाकले.२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमूखी पडलेले IB अधिकारी मनीष रंजन यांच्या पत्नी जया मिश्रा अजूनही धक्क्यातून सावरलेल्या नाहित. मनीष रंजन हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. त्या काळ्या दिवसामुळे त्यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. ज्याची आठवण येताच त्या आपली शुद्ध हरपतात.

जय मिश्रा सांगतात की दहशतवाद्यांनी मनीषचे नाव आणि धर्म विचारला आणि नंतर त्यांच्यावर १० ते १२ गोळ्या झाडल्या. जया आणि तिच्या मुलांनी मनीषला, त्यांच्या डोळ्यासमोर गोळ्या घालून ठार मारताना पाहिले. असहाय्य आणि रक्ताने माखलेले मनीष जमिनीवर पडले होते. “काश्मीरच्या डोंगररांगांमध्ये गोळीबाराचे आणि लोकांच्या किंचाळण्याचे आवाज ऐकू येत होते. परिस्थिती इतकी भयानक होती की आमच्या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी तिथून पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता” असे जया सांगतात.अशा कठिण प्रसंगी जयाने मुलांसह त्या टेकड्यांमधून खाली उतरणेच योग्य मानले. टेकडीवरून खाली उतरताना, त्यांनी पहिलं त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या हातावर बांधलेले रक्षाकवचाचे धागे कापले.

अडचणींपासून वाचवण्यासाठी असलेले ते रक्षाकवचाचे धागे त्यांच्यासाठी मृत्यूचा फास बनले होते. दहशतवाद्यांनी त्यांना हिंदू म्हणून ओळखू यासाठी, त्यांनी मनगटावर बांधलेले रक्षाकवचाचे धागे तोडून टाकले. पळून जात असताना जयाला एक स्थानिक महिला भेटली आणि त्या महिलेजवळ जयाने बुरखा घालायला मागितला. स्थानिक महिलेने जयाला बुरखा घालण्यास दिला.जम्मू काश्मीरच्या ज्या सुंदर दऱ्यांमध्ये कुटुंब आनंद आणि सुट्टी साजरी करण्याम्हणाल्या. १० ते १२ किमी पर्यंत असं वाटत होतं की आयुष्य माझी परीक्षा घेत आहे. टेकडीच्या मध्यभागी एक नदी आढळली. कसंतरी त्यांनी आपल्या मुलीला घेऊन नदी ओलांडली. बराच अंतर पळून गेल्यावर त्यांना लष्कराचे सैनिक सापडले. पण पहलगाममध्येही दहशतवादी लष्कराच्या गणवेशासारखे कपडे घालून आले होते, त्यामुळे त्या घाबरल्या. परंतु लष्कराच्या जवानांनी त्यांना विश्वासात घेतले आणि नंतर त्यांना सोबत घेऊन गेले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.