मनसेला भाजपचा नकार; ‘प्रतिसभागृहा’साठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण दिल्याने नाराजी.

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या प्रतिसभागृहाचे आमंत्रण भारतीय जनता पक्षाने नाकारल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या प्रतिसभागृहाचे आमंत्रण भारतीय जनता पक्षाने नाकारल्याची माहिती पुढे आली आहे. मनसेने शिवसेना उबाठा पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना आमंत्रित केल्याने, भाजपने ही भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘राजकीय टाळी’ची चर्चा सुरू असतानाच, भाजपने मनसेचे निमंत्रण नाकारल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.मागील काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने पालिकेचे सभागृहाच भरलेले नाही. त्यामुळे लोकांच्या अनेक प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने, मनसेने महापालिकेच्या धर्तीवर प्रतिसभागृह आयोजित करण्याची घोषणा केली होती.

या प्रतिसभेसाठी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून राज्यातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. यात शिवसेना उबाठा पक्षाचे आदित्य ठाकरे, भाजपचे आशीष शेलार, समाजवादी पक्षाचे रईस शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाच्या राखी जाधव, मुंबई काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांना आमंत्रित करण्यात आले होते.शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघात हे प्रतिसभागृह भरविले जाणार आहे. मात्र मनसेचे हे आमंत्रण भाजपने नाकारले आहे. भाजपचे आशीष शेलार यांच्याकडून पत्र पाठवून हे आमंत्रण नाकारले असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

मनसेकडून शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपने नाराजी दर्शवत या प्रतिसभागृह कार्यक्रमासाठी येणार नसल्याचे मनसेला कळविल्याचे सांगण्यात येते.राज्यात एकीकडे शिवसेना उबाठा आणि मनसेच्या मनोमिलनाच्या चर्चेला उधाण आलेले असतानाच, भाजपने मनसेचे आमंत्रण नाकारल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्याशिवाय भाजपचे मंत्री आशीष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात दुरावा वाढत असल्याचेही यानिमित्ताने बोलले जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.