42 वर्ष परदेशात अडकला भारतीय व्यक्ती, अखेर 4 दशकांची प्रतिक्षा संपली, मायदेशात झाले पुनरागमन.

तब्बल 42 वर्ष परदेशात अडकलेल्या भारतीय व्यक्ती मायदेशी परतला आहे. परदेशात जाऊन एखादी चांगली नोकरी मिळवून आपल्या कुटुंबिंयाचे जीवन चांगले करता येईल अशी आशा त्यांना होती.त्यामुळे अनेक भारतीय लोकांप्रमाणेच तेही एक स्वप्न घेऊन परदेशी गेले होते.तब्बल 42 वर्ष परदेशात अडकलेल्या भारतीय व्यक्ती मायदेशी परतला आहे. केरळचे रहिवासी असलेल्या गोपाल चंद्रन यांच्यावर चार दशकाहून अधिक काळ परदेशात अडकून पडण्याची नामुष्की ओढावली. 74 वर्षीय गोपालन हे 80 च्या दशकात बहारीनमध्ये रोजगारसाठी गेले होते.केरळच्या त्रिवेंद्रमच्या एका गावात राहणारे गोपालन 16 ऑगस्ट 1983 रोजी बहारीनला पोहचले. तिथे जाऊन एखादी चांगली नोकरी मिळवून आपल्या कुटुंबिंयाचे जीवन चांगले करता येईल अशी आशा त्यांना होती.त्यामुळे अनेक भारतीय लोकांप्रमाणेच तेही एक स्वप्न घेऊन परदेशी गेले होते.

पण अचानक त्यांच्या जीवनात विचित्र घटना घडली आणि ते तिथे तब्बल 40 वर्षाहून जास्त काळ अडकून पडले.बहारीनला पोहचल्यानंतर त्यांना नोकरी मिळाली. मात्र काही कालावधीतच त्यांना नोकरी दिलेल्या व्यक्तीचे निधन झाले. त्यात त्यांचा पासपोर्टही हरवला, त्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे राहिली नाहीत. त्यांनी अनेकदा कागदपत्र मिळवण्याचे प्रयत्न केले मात्र नोकरशाहीच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांना ती मिळवता आली नाहीत. अखेर त्यांना तिथेच राहावे लागले. एक एक वर्षे करत तब्बल 40 वर्षाहून जास्त काळ लोटला. त्यांच्या मायदेशी परतण्याचा आशा धुसरच झाल्या.

कायदेशीर प्रक्रियेच्या अनिश्चिततेत मायदेशी परतण्याची शक्यता नसल्याने चंद्रन आपले जीवन अंधारात जगत होते. प्रवासी लिगल सेलमुळे त्यांना आशेचा किरण दिसू लागला. लिगल सेलचे बहारीन प्रांप्त अध्यक्ष सुधीर थिरुनीलथ यांनी आपल्या टीमसोबत बहारीनमधील भारतीय दूतावास आणि तेथील स्थलांतर विभागामध्ये समन्वय घडवला. त्यामुळे नोकरशाहीच्या ढिसाळ कारभारामुळे अडकेलेल्या चंद्रन यांना तेथून भारतात परतता आले.त्यांच्या 95 वर्षाच्या आईने चंद्रन यांच्या आईनेही मुलाच्या परतण्याची आस सोडली होती. मात्र आज त्यांच्यासाठी सुखद दिवस होता त्यांना आपल्या मुलाला अखेर पाहता आले.पीएलसी ही एक बिगर सरकारी संघटना आहे. जी भारत आणि परदेशात अन्यायाचा सामना करणाऱ्या भारतीयांसाठी लढते. ज्यामध्ये निवृत्त न्यायाधीश, वकील, पत्रकार यांच समावेश आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.