बीडच्या ‘आवादा’मधील चोरीचा अखेर छडा, चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

 बीडमधील ‘आवादा’ कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पातून तांबे चोरणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षा रक्षकांना बांधून ही चोरी करण्यात आली होती. पोलिसांनी 11,58,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, खंडणीच्या आरोपानंतर ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आरोपी धाराशिव जिल्ह्यातील आहेत.’आवादा’ कंपनीच्या पनवचक्की प्रकल्पावर सुरक्षारक्षकांना बांधून घालून तेथून तांबे चोरून नेणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ११,५८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आवादा कंपनी चर्चेत असतानाच तिथे चोरीची घटना घडल्याने मोठी खळबळ निर्माण झाली.

सात एप्रिल रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास आवादा कंपनीच्या पवनचक्कीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी चोरी झाली होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. शेख यांच्या पथकानेे बबन सरदार शिंदे (रा. नांदूर ता. केज), धनाजी रावजी काळे आणि मोहन हरी काळे (दोघे रा. लक्ष्मी पारधी वस्ती जि. धाराशिव) आणि लालासाहेब सखाराम पवार (रा. दसमेगाव ता. वाशी, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले.आवादा कंपनीतील चोरीच्या प्रकारानंतर अनेक गंभीर आरोप करण्यात आली होती. वाल्मिक कराडची टीम अजूनही कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला होता. दुसरीकडे सुरेश धस यांच्याकडून वेगळाच दावा करण्यात आला. आता अखेर पोलिसांनी आवादा कंपनीत चोरी करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मोठा मुद्देमालही जप्त करण्या आलाय. चोरटे हे धाराशिव जिल्हातील असल्याचे स्पष्ट झाले.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आवादा कंपनी चर्चेत आहे. वाल्मिक कराडने दोन कोटींची खंडणी मागितल्याचे आरोप आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जबाव देखील दिला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आहे. बीडमधील अनेक मारहाणीचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरही काही आरोप हे करण्यात आले आहेत. बीड महानगरपालिकेच्या लेखापालला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

  • Related Posts

    कालिका माता परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पोलीस चौकी उभारण्यात यावी, मनसेची आग्रही मागणी.

    मा. पोलीस अधिक्षक साहेब जळगाव सप्रेम जय महाराष्ट्र विषय :- रा.म. क्र. ६ कालिका माता परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पोलीस चौकी उभारण्यात यावी, मनसेची आग्रही मागणी महोदय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदनाद्वारे…

    नशेचं इंजेक्शन देऊन 38 दिवस कोंडलं, टिटवाळ्यात तरुणीवर अत्याचार, मैत्रिणीसह 7 जणांवर गुन्हा.

     टिटवाळा परिसरात एका २१ वर्षीय तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली. आजीसोबत भांडणानंतर मैत्रिणीच्या घरी आश्रयाला गेलेल्या तरुणीला मैत्रिणींनी नशेचे इंजेक्शन देऊन कोंडून ठेवले. तिच्या ओळखीतील चार ते पाच जणांनी तब्बल ३८…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    कालिका माता परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पोलीस चौकी उभारण्यात यावी, मनसेची आग्रही मागणी.

    कालिका माता परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पोलीस चौकी उभारण्यात यावी, मनसेची आग्रही मागणी.

    नशेचं इंजेक्शन देऊन 38 दिवस कोंडलं, टिटवाळ्यात तरुणीवर अत्याचार, मैत्रिणीसह 7 जणांवर गुन्हा.

    नशेचं इंजेक्शन देऊन 38 दिवस कोंडलं, टिटवाळ्यात तरुणीवर अत्याचार, मैत्रिणीसह 7 जणांवर गुन्हा.

    पाकला मदत केली अन् जगासमोर इभ्रत गेली; चीनवर सलग दुसऱ्या दिवशी नामुष्की, भारताचा धडाका.

    पाकला मदत केली अन् जगासमोर इभ्रत गेली; चीनवर सलग दुसऱ्या दिवशी नामुष्की, भारताचा धडाका.

    भीषण अपघात! ट्रेलर आणि एसटीची जोरदार धडक; बस एका बाजूने अक्षरश: चिरली अन् चार जण दगावले.

    भीषण अपघात! ट्रेलर आणि एसटीची जोरदार धडक; बस एका बाजूने अक्षरश: चिरली अन् चार जण दगावले.