
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच रायगडचा दौरा करुन गेले. पण तरीही पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही.रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच रायगडचा दौरा करुन गेले. पण तरीही पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. शहा यांनी रायगडमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंची भेट घेतली. मात्र त्यानंतरही पालकमंत्रिपदाचा पेच कायम आहे.रायगडच्या पालकमंत्रिपदामुळे नाशिकचं पालकमंत्रिपद अडल्याची नवी माहिती समोर आली आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरेंची वर्णी लागली होती. पण शिवसेनेनं आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावर सेनेनं दावा सांगितल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती दिली. त्या घडामोडीला आता जवळपास तीन महिने होत आले आहेत.
आता रायगडमुळे नाशिकचं पालकमंत्रिपद लटकलं आहे. अमित शहा नुकतेच रायगडला येऊन सुनील तटकरेंच्या घरी येऊन गेले. या सगळ्या घडामोडी पाहता रायगडचं पालकमंत्रिपद पुन्हा एकदा अदिती तटकरेंकडे जाण्याची शक्यता आहे. सेनेचे भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रिदासाठी उत्सुक आहेत. जिल्ह्यात सेनेचे तीन आमदार आहेत. गोगावलेंच्या नावाला त्यांचा पाठिंबा आहे. तर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या केवळ १ आमदार आहेत. त्या खुद्द अदिती तटकरेच आहेत.रायगडचं पालकमंत्रिपद पुन्हा तटकरेंकडे गेल्यास नाशिकच्या पालकमंत्रिदावर दावा सांगायचा अशी रणनिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आखली आहे. नाशिकचं पालकमंत्रिपद आधी भाजपच्या गिरीश महाजनांना देण्यात आलं होतं. २०२७ मध्ये नाशकात कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळा मंत्री असलेले महाजन नाशिकचं पालकमंत्रिपददेखील स्वत:कडे राखण्यास उत्सुक आहेत.
Video Player
00:00
00:00