मिसाइलनंतर आता हायपरसोनिक शस्त्र देखील सज्ज, भारताच्या खऱ्या हल्ल्यापूर्वीच पाकिस्तानचे धाबे दणाणणार.

भारत आता पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत दिसत आहे. शुक्रवारी हायपरसोनिक शस्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अॅडव्हान्स्ड स्क्रॅमजेट कनेक्टेड टेस्ट फॅसिलिटी ची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहेत. भारत आता पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत दिसत आहे. शुक्रवारी हायपरसोनिक शस्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अॅडव्हान्स्ड स्क्रॅमजेट कनेक्टेड टेस्ट फॅसिलिटी ची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. याआधी गुरुवारी भारतीय नौदलाने अरबी समुद्रात या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती.डीआरडीओने म्हटले आहे की, हैदराबादस्थित डीआरडीएल प्रयोगशाळेने हायपरसोनिक शस्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे .

डीआरडीएलने २५ एप्रिल २०२५ला हैदराबाद मध्ये नव्याने निर्माण केलेल्या अॅडव्हान्स्ड स्क्रॅमजेट कनेक्टेड टेस्ट फॅसिलिटी (एससीपीटी) येथे १००० सेकंदांपेक्षा जास्त कालावधीसाठी अ‍ॅक्टिव्ह कूल्ड स्क्रॅमजेट सबस्केल कम्बस्टरची ग्राउंड टेस्टिंग केली. ही ग्राउंड टेस्टिंग जानेवारी २०२५ मध्ये १२० सेकंदांसाठी घेण्यात आलेल्या पूर्वीच्या चाचणीचा पुढील टप्पा आहे. आजच्या यशस्वी चाचणीसह ही प्रणाली लवकरच संपूर्ण ताकदीने कॉम्बस्टर चाचणीसाठी तयार होणार आहे.तत्पूर्वी, पहलगाम हल्ल्याच्या ४८ तासांच्या आत भारताने गुरुवारी युद्धनौका आयएनएस सुरतमधून क्षेपणास्त्राची चाचणी केली ज्यातून शत्रूंना कडक संदेश दिला आहे. नौदलाने मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागले आहे.

नौदलाच्या म्हणण्यानुसार, या काळात भारताचे स्वदेशी क्षेपणास्त्र विध्वंसक नौका आयएनएस सुरतने समुद्रात लक्ष्य गाठण्यात यश मिळवले आहे. या चाचणी दरम्यान, भारतीय नौदलाच्या नवीनतम स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र विनाशक आयएनएस सुरतने समुद्रात अचूकपणे हल्ला केला आहे.काही दिवसांपूर्वीच, डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने स्वदेशी रुपात विकसित केलेल्या व्हर्टिकल-लांच्ड शॉर्ट-रेंज सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्राची (VLSRSAM) यशस्वी चाचणी घेतली होती. ही चाचणी २६ मार्चला दुपारी १२ वाजता ओडिशा किनाऱ्यावरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) येथून घेण्यात आली. या कालावधीत, क्षेपणास्त्राने जमिनीवरून येणाऱ्या उभ्या लाँचरवरून अतिशय जवळून आणि कमी उंचीवर असलेल्या एका हाय-स्पीड हवाई लक्ष्याला हाणून पाडले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.