पहलगाम हल्ल्यावरुन नितेश राणेंनी ठाकरेंवर तोफ डागली; म्हणाले, ‘बाळासाहेबांचा मुलगा साधा निषेधाचा शब्द…’

 मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे व गिरीश महाजन काश्मीर येथे गेले होते. ‘हल्ल्याबाबत बाळासाहेबांचा मुलगा साधा निषेधाचा शब्द बोलू शकत नाही’ असे राणे म्हणाले.मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे  व संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर  एकनाथ शिंदे व गिरीश महाजन काश्मीर येथे गेले होते. यावरून संजय राऊत यांनी टीका केली होती, संजय राऊत यांनी केलेल्या टिकेबद्दल विचारलं असता राणे म्हणाले की, आमच्या सरकारचे एकनाथ शिंदे साहेब, गिरीश महाजन साहेब काश्मीरला तरी गेले. तुझ्या मालकासारखे लंडनला जाऊन बसले नाहीत. आज इतका मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. पण बाळासाहेबांचा मुलगा साधा निषेधाचा शब्द बोलू शकत नाही, अशा शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.

कोकणात दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे झालेल्या हिंदू जनजागृती आले असता त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला.नितेश राणे म्हणाले की, आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरीश महाजन या सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे. ते मिनिटाला माहिती घेत होते आणि जे लंडनमध्ये बसून या सगळ्यांची जे काही मजा बघत आहेत. त्या उद्धव ठाकरेचा आम्ही धिक्कार करतो आणि ही अशी लोकं दहशतवाद्यांपेक्षा कमी नसतात, असेही राणे म्हणाले आहेत. सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंचे खासदार उपस्थित नव्हते. या प्रश्नावर राणे म्हणाले की, अहो हे हिरव्या वळवळणाऱ्या साप, हे लोक कायम बाजूला असतात म्हणून तर आम्ही उद्धव ठाकरे यांना जिहादीह्रदयसम्राट असं नाव दिलं आहे आणि हा जिहादीहृदयसम्राट आहे मग त्याचे खासदार बैठकीला कसे जाणार. असाही टोला राणेंनी लगावला. यावेळी त्यांनी पाजपंढरी येथील श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले.हिंदू जनजागृती सभेत बोलताना नितेश राणेंनी आक्रमक पवित्रा घेतला होता. विकास या सगळ्या गोष्टी होत राहतील, पण हा आमचा समुद्रकिनारा सुरक्षित ठेवण्यासाठी या खात्याचा मंत्री नितेश राणे बसला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. मी कोणाचीही मस्ती चालू देणार नाही.

हे जे काही वळवळ करणारे हिरवे साप आहेत ना त्यांना कसे नीट करायचे, त्याची सगळी औषधं आमच्याकडे आहेत. कोणाला इंजेक्शन कोणाला गोळ्या चालतात, ही सगळी औषधे आमच्याकडे आहेत, असा सज्जड इशारा नितेश राणे यांनी दिला. यावेळी व्यासपीठावर मच्छिमार समाजाचे नेते पीएन चौगुले, अॅड. अमेय मालशे उपस्थित होते
राणे पुढे म्हणाले, ‘एक हिंदू म्हणून तुम्ही एकत्र राहा. मी तुम्हाला विश्वास देतो तुमच्याकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही. हा विश्वास तुम्हाला मी देतो. हिंदू म्हणून एकत्र राहण्याची गरज आहे. बघा काय चाललंय देशामध्ये काश्मीरमध्ये जात भाषा विचारली नाही, फक्त धर्म विचारला आणि हिंदू धर्म आहे ना म्हणून गोळी मारली हे लक्षात ठेवा. ते धर्म विचारून गोळ्या मारत असतील तर मग तुम्ही व्यवहार आणि खरेदी करताना धर्म विचारून तरी खरेदी करा, असेही राणे म्हणाले.तुम्ही आमच्या मुलांना दगड मारलात, तर आज तुमचा कॅबिनेट मंत्री आला आहे. तुमची बाजू घेऊन मी येथे सभा घेतोय. ही ताकद आहे तुमच्या देवा भाऊंची, ही ताकद आहे तुमच्या एका मताची, तुम्ही फक्त एकजूट दाखवा बाकी सगळं सरकार म्हणून तुम्ही आमच्यावर सोडा, हा विश्वास मी तुम्हाला देतो, असेही राणेंनी उपस्थितांना संबोधित केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.