कोणताही भ्रष्टाचार नको, निधीमध्ये गडबड झाली तर जिल्हाधिकाऱ्यांनाही सोडणार नाही, अजित दादांचा इशारा.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी जिल्हा नियोजन बैठकीत प्रशासनाला सज्जड दम भरला. जिल्हा नियोजन निधीमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. चुकीचे काम आढळल्यास जिल्हाधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. राज्याच्या अर्थ आणि नियोजन विभागाचा मी मंत्री आहे, त्यामुळे ३६ जिल्ह्याचं नियोजन यावर्षी मी केलं आहे. २१ हजार कोटी रुपयांचं नियोजन ३६ जिल्ह्यांसाठी केलेलं आहे. जिल्हा नियोजन निधीच्या संदर्भामध्ये मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित झाली पाहिजे, डीपीसीच्या निधीबाबत मला वाईट अनुभव राज्यात आला आहे. काही ठिकाणी चुकीच्या प्रकारचं नियोजन केलं जात आहे. जर यामध्ये कसलंही चुकीचं आढळून आलं, तर मी जिल्हाधिकाऱ्यांना देखील सोडणार नसल्याचं वक्तव्य करत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट प्रशासनात जिल्हाधिकाऱ्यांनाचं दम दिला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या परभणी जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी परभणीच्या पोखरणी नरसिंह मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतल्यानंतर जिल्ह्यातील दौऱ्याला सुरुवात केली. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा नियोजनची बैठक संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर खासदार संजय जाधव आमदार राजेश विटेकर, आमदार डॉक्टर राहुल पाटील,

आमदार रत्नाकर गुट्टे हे प्रमुख उपस्थित होते.पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की डीपीसीच्या निधीचं योग्य नियोजन आम्ही केलेलं आहे. कोणत्या विभागाला किती निधी द्यायचा याचं देखील नियोजन आहे.अपंगांसाठी देखील यावेळी एक टक्का नियोजन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर क्रीडासाठी देखील एक टक्का नियोजन यावर्षीपासून सुरू करण्यात आलं आहे. जिल्ह्यामध्ये एन्ट्री केल्यावरच कळतं की जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याकडे त्यांचं किती लक्ष आहे.नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत डीपीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो, पण त्यामध्ये बऱ्याचदा अनियमितता असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मी विभागाचे सचिव देवरायांना सांगितलं आहे, की यावर्षी आपल्याला ३६ जिल्ह्याच्या नियोजनामध्ये नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जो खर्च होतो त्याची तपासणी करायची आहे. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत होणारा भ्रष्टाचार थांबवायचा आहे.

टेंडर प्रक्रिया देखील सुनियोजित झाली पाहिजे, ऑनलाइन टेंडर आणि ऑफलाइन टेंडर यामध्ये कसल्याही प्रकारची तफावत नसली पाहिजे, असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी तिघं मिळून राज्याचा कारभार सुरळीत आणि स्वच्छ चालला पाहिजे यासाठी काम करत आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात जी काही कामं होतील ती गुणवत्तेची आणि पारदर्शक झाली पाहिजेत, कसल्याही कामात भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे आणि जर भ्रष्टाचार झाला, तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना सज्जड दम दिल्याने जिल्ह्याच्या प्रशासनाचा कारभार सुरळीत होईल का असा प्रश्न मात्र आता निर्माण झाला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.