ठाकरेंसकटसाहेब, दादा, भाऊंना एकत्रच भाईंचा झटका, अपक्ष लढून हजारो मतं खाणाऱ्या बड्या नेत्याचा शिवसेना प्रवेश.

उद्धव ठाकरे, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजेच साहेब, भाऊ, दादा अशा सर्वांनाच उपमुख्यमंत्री एकनाथ ‘भाई’ शिंदे यांनी चांगलाच झटका दिला असल्याची जोरदार चर्चा अकोल्यात रंगली आहे.आदिवासी बहुल मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातील ठाकर समाजाचे नेते, अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मेंगाळ यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे 60 आजी-माजी सरपंच, अकोले नगरपंचायतीचे 14 आजी माजी नगरसेवक यांच्यासह विविध सहकारी संस्थेतील संचालक, ठाकरेंची शिवसेना, भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते शनिवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत.

सकाळी अकोले शहरातून शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते ठाण्याकडे रवाना झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजेच साहेब, भाऊ, दादा अशा सर्वांनाच उपमुख्यमंत्री एकनाथ ‘भाई’ शिंदे यांनी चांगलाच झटका दिला असल्याची जोरदार चर्चा अकोल्यात रंगली आहे.शिवसेना एकसंघ असताना अकोले तालुक्यात शिवसेनेची मोठी ताकद होती आणि त्यावेळेस मारुती मेंगाळ अकोले पंचायत समितीचे उपसभापती राहिले आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे शिवसेनेची ताकद अकोल्यात कमी झाल्याचे दिसून आले मात्र मारुती मेंगाळ यांच्या सेना प्रवेशामुळे शिवसेना अकोल्यात उभारी येईल अशी चर्चा आहे.विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते,

विविध सहकारी संस्थांमधील आजी-माजी संचालक नगर पंचायत समिती माजी नगरसेवक आणि जवळपास 60 ग्रामपंचायतींचे आजी-माजी सरपंच आणि शेकडो कार्यकर्ते आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असून 100 पेक्षा अधिक वाहने ठाण्याच्या दिशेने रवाना झाली आहे. या कार्यकर्त्यांमध्ये माजी आमदार पिचड आणि विद्यमान आमदार लहामटे यांचे कार्यकर्ते सुद्धा असल्याचा दावा मेंगाळ यांनी केलाय. एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन आणि अकोले तालुक्याच्या विकासासाठी आम्ही शिंदे गटात प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया मारुती मेंगाळ व त्यांच्या समर्थकांनी दिली आहे.मारुती मेंगाळ हे अकोले तालुक्यातील आदिवासी खातर समाजाचे नेते मानले जात असून शिवसेनेकडून अकोले पंचायत समितीचे उपसभापती राहिले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेना सोडत अजित पवारांच्या विचारांसोबत राहिले. अकोले मतदारसंघात 2024 ची विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली असून दहा हजार मतं मिळवली आणि आता शिवसेनेत प्रवेश करीत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.